सुनेत्रा पवार यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी; अजितदादांनी सांभाळलेल्या 'या' मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

Sunetra Pawar Heads Pune Education Board: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड झाली आहे. याआधी अजित पवार यांनी दोन दशके हे पद भूषवले होते.
Sunetra Pawar Heads Pune Education Board:
Sunetra Pawar unanimously elected as the new President of the Pune District Education Board during the members’ meeting in Pune.saam tv
Published On
Summary

सुनेत्रा पवार यांची पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

हे पद यापूर्वी २० वर्षे अजित पवार यांनी सांभाळले होते.

ग्रामीण शिक्षण विस्तारासाठी मंडळाची महत्त्वाची भूमिका.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आली आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सभासदांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड झाली. हे पद अजित पवारांकडे होते. अजित पवार २० वर्षापासून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार केला.

Sunetra Pawar Heads Pune Education Board:
मुख्यमंत्री फडणवीसांसह सुनेत्रा पवार, भुजबळांचा VSR विमानानं मुंबई-नाशिक प्रवास, बघा VIDEO

अद्ययावत इमारती बांधल्या आणि एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. तसेच बीड आणि पुणे जिल्ह्यांचे पालकमंत्रिपदाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदासह विविध संस्थांमधील जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

Sunetra Pawar Heads Pune Education Board:
Shikhar Bank Scam : अजित पवार, सुनेत्रा पवारांना शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लीन चिट, रोहित पवारांनाही दिलासा

आज सुनेत्रा पवार यांनी प्रथमच जिल्हा शिक्षण मंडळाचा आढावा घेतला. मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. भविष्यातील योजना जाणून घेतल्या. तसेच यावेळी दादांचे काम आणखी पुढे नेणार असल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणार”: सुनेत्रा पवार

माळेगाव सहकारी साखर कारखाना देशात क्रमांक एक बनावा. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे व नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. सर्वजण मिळून अजितदादांचे स्वप्न नक्की पूर्ण करू, असा मला ठाम विश्वास आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांनी आज माळेगाव साखर कारखान्याला भेट दिली.

गेली काही वर्ष अजितदादांची सकाळ कारखान्याचे एमडी यांना फोन करण्यापासून होत असायची. अनेक कारखान्यांना मी देखील अधून-मधून भेट देत होते. कारखान्याबाबत सखोल माहिती नसली तरी माझी तोंड ओळख आहे. त्यामुळे काम करताना जरी अडचणी आल्या तरी सहकाऱ्यांमुळे अशक्य होणार नाही. कारखाना कसा चांगला चालेल याकडे माझे लक्ष असेन असं त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com