Shikhar Bank Scam : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळालाय...या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. न्यायालयाने अण्णा हजारे यांचा आक्षेप आणि ईडीचा हस्तक्षेप अर्ज फेटाळून लावला. यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह ७० जणांच्या क्लीन चिटवर शिक्कामोर्तब झालंय. त्यामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या प्रकरणावर अखेर पडदा पडला आहे. ‘गुन्हेगारी प्रकरण दिसत नाही’, असे निरीक्षण नोंदवत न्यायाधीश महेश जाधव यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा (ईओडब्ल्यू) ‘सी-समरी’ अहवाल स्वीकारला. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर शिखर बँक घोटाळाप्रकरणी पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.