Maharashtra Government Scheme: लाडक्या बहिणींसाठी सरकारची आणखी एक योजना, सुनेत्रा पवारांकडून घोषणा

Maharashtra Deputy CM Sunetra Pawar Big Announcement: राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी लाडकींसाठी आणखी एक मोठी घोषणा केली. सरकारकडून 'लवकर या , लवकर जा' ही नवीन योजना आणण्यात आली आहे.
Sunetra Pawar Will be Finance Minister:
Maharashtra Deputy CM Sunetra Pawar saam tv
Published On

Summary -

  • राज्य सरकारकडून महिला कर्मचाऱ्यांसाठी नवी योजना

  • ‘लवकर या, लवकर जा’ योजनेची सरकारकडून घोषणा

  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत मोठी घोषणा

  • मुंबईतील सरकारी महिला कर्मचाऱ्यांना गर्दीच्या त्रासातून दिलासा मिळणार

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. गर्दीच्या वेळी महिलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सरकारकडून 'लवकर या, लवकर जा' ही नवीन योजना आणण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधान परिषदेत या नव्या योजनेची घोषणा केली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सुनेत्रा पवार यांच्याकडून राज्यातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ही योजना अंमलात आणण्यात आली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधान परिषदेत पहिले निवेदन दिले. यावेळी बोलताना त्यांनी महिलांसाठी 'लवकर या, लवकर जा' ही संकल्पना मांडली. त्याशिवाय लाडकी बहीण योजना, प्रसूती रजा, शक्ती कायदा यासह अनेक विषयांवर त्यांनी भूमिका मांडली. ऊसतोड महिलांसाठीही त्यांनी खास योजना लागू केली. विधान परिषदेत निवेदन करताना अजित पवार यांच्या कामाचा उल्लेख करत सुनेत्रा पवार भावुक झाल्या होत्या.

Sunetra Pawar Will be Finance Minister:
Maharashtra Government: मोठी बातमी! गावातच मिळणार नॉन-क्रीमिलेअर आणि जातीचा दाखला, १६ शासकीय सुविधाही मिळतील तुमच्याच गावात

महिला दिनाचे औचित्य साधत सुनेत्रा पवार यांच्याकडून राज्यातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी 'लवकर या, लवकर जा' ही योजना अंमलात आणण्यात आली. सकाळी कामावर येताना मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ही योजना आणण्यात आली आहे. राज्यातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी आता ९.१५ वाजता कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी लाडकी बहीण योजना आणि शेतकरी महिलांबाबत मोठे वक्तव्य केले. लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याचे त्यांनी सांगितले.

Sunetra Pawar Will be Finance Minister:
Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, महसूल मंत्र्यांची घोषणा

चौथे महिला धोरण लागू करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली. शक्ती कायदा लवकरच संमत व्हावा यासाठी शासन आग्रही आहे. महिलांना १८० दिवसांची प्रसूती रजा मिळणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. त्याशिवाय अंगणवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकार प्रयत्नशील असून राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत असल्याचे सुनेत्रा पवारांनी सांगितले.

Sunetra Pawar Will be Finance Minister:
Maharashtra Government: तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे 100% शुल्क माफ; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com