Maharashtra Government: मोठी बातमी! गावातच मिळणार नॉन-क्रीमिलेअर आणि जातीचा दाखला, १६ शासकीय सुविधाही मिळतील तुमच्याच गावात

Caste Certificates Get In Villages: महाराजस्व अभियानांतर्गत, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामस्थांना आता मार्च आणि एप्रिलमध्ये गावस्तरीय शिबिरांमध्ये नॉन-क्रिमी लेयर, जात आणि उत्पन्न प्रमाणपत्रांसह १६ प्रमुख महसूल सेवा मिळतील.
Revenue officials interact with villagers during Maharajswa Abhiyan camp offering certificates and document services at village level.
Revenue officials interact with villagers during Maharajswa Abhiyan camp offering certificates and document services at village level.
Published On
Summary
  • गावपातळीवर १६ महसूल सुविधा उपलब्ध होणार.

  • नॉन-क्रीमिलिअर, जातीचा आणि उत्पन्नाचा दाखला गावातच मिळणार.

  • मार्च–एप्रिलमध्ये महसूल शिबिरे आयोजित.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, शालेय विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शासकीय योजनांसाठी पात्र लाभार्थींचे प्रश्न आता तुमच्याच गावातच सुटणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत गावातच ‘एनए’ (अकृषिक) परवाना, सातबारा उताऱ्यावरील दुरुस्ती, प्रलंबित फेरफार नोंद, विद्यार्थ्यांना जातीचे, उत्पन्नाचे दाखले, नॉन-क्रीमिलिअर देण्याची सुविधा पुरवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महसूल विभागातर्फे तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळात महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिरे घेतली जाणार आहेत. हे शिबिरे मार्च व एप्रिल महिन्यातील प्रत्येकी दोन दिवस घेतली जातील. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबिर सुरु राहतील. यात महसूल मंडळाअंतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांना सहभागी होता येईल. यातून गावगाड्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न कोणत्याही मध्यस्थांशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गावातच सुटतील.

Revenue officials interact with villagers during Maharajswa Abhiyan camp offering certificates and document services at village level.
Farm Land: आता जमिनीवरून नाही होणार वादावादी; सामाईक शेतजमिनी होणार शेतकऱ्यांच्या नावावर

दरम्यान महसूल प्रशासन अधिक लोकाभिमूख, कार्यक्षम व गतिमान होण्याच्या दृष्टीने ही शिबिरे पहिल्या टप्प्यात ग्रामीण हद्दीतील महसूल मंडळांमध्ये होत आहेत. त्यानंतर मे महिन्यात नगरपालिका क्षेत्रातील महसूल मंडळात समाधान शिबिरे होणार आहेत. प्रत्येक महसूल मंडळातील शिबिरांच्या उद्‌घाटनासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व त्या त्या तालुक्याचे तहसीलदार असे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील.

राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यातील मंडळांमध्ये हे अभियान राबविले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्यातील ११ आणि मोहोळ तालुक्यातील ९ महसूल मंडळांमध्ये समाधान शिबिरे होणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून गावागावातील नागरिकांच्या कागदपत्रांसंदर्भातील अडचणी जागेवरच सोडविल्या जातील. यावेळी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह इतरही अधिकारी उपस्थित असतील.

Revenue officials interact with villagers during Maharajswa Abhiyan camp offering certificates and document services at village level.
PM KISAN Yojana: बटाईदार शेतकरीही पीएम किसान योजनेसाठी पात्र असतात? दुसऱ्याच्या शेतात काम करणाऱ्यांनाही ६ हजार रुपये मिळतात का?

कोणत्या सेवा गावात मिळतील

घरांसाठी पट्टेवाटप, ई-मोजणी अर्ज, शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-अधिक पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्यावत करणे, सातबारा उताऱ्यावरील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा, आठ-अ वाटप, उत्पन्न, रहिवासी व जातीचा दाखला, नॉन-क्रीमिलिअर, अकृषिक (एनए) परवाना, त्यासंदर्भातील मार्गदर्शन, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांच्या लाभाची मंजुरी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाच्या तक्रारींचा निपटारा आदी सुविधा यातून मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com