Weight Loss Tips : घरच्याघरी ही ६ कामे करा; घाम न गाळता वाढलेली ढेरी गायब होईल

Tips For Lose Stubborn Belly Fat : फास्ट फूड खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर याचे दुष्परिणाम होतात. शरीरातील अतिरिक्त चरबी वाढत जाते. वजन वाढल्यावर आपल्याला कोणतंही काम करताना थकवा आणि धाप लागते.
Tips For Lose Stubborn Belly Fat
Weight Loss TipsSaam TV
Published On

रोजच्या जीवनात आपण विविध पदार्थ खातो. यामध्ये अनेकदा आपल्या आहारात आठवड्यातून एकदा तरी फास्ट फूटचा समावेश होतो. फास्ट फूड खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर याचे दुष्परिणाम होतात. शरीरातील अतिरिक्त चरबी वाढत जाते. वजन वाढल्यावर आपल्याला कोणतंही काम करताना थकवा आणि धाप लागते.

Tips For Lose Stubborn Belly Fat
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी चपाती ऐवजी 'या' पोळ्या खा; झटपट बारीक व्हाल

वजन वाढलेल्या व्यक्तीला आपल्याला हवे तसे कपडेही पिरधान करता येत नाहीत. शिवाय आपण चांगले दिसत नाही याचा त्यांच्या मनात न्यूनगंड तयार होतो. आलेला लठ्ठपणा कमी व्हावा यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही तोडगा शोधत असतो. त्यासाठी काही जण जास्तप्रमाणात व्यायाम देखील करतात.

व्यायाम करणे, रस्त्यावर फार दूरपर्यंत जास्त वेळ चालणे असे केल्याने आपलं वजन कमी होतं. मात्र काही व्यक्तींचे रोजचे शेड्यूल इतके व्यस्त असते की त्यांना व्यायाम करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही. तसेच काही तरुण असेही असतात ज्यांना व्यायाम करणे अजिबात आवडत नाही. अशा व्यक्तींसाठी आम्ही वजन कमी करण्यासाठी काही टिप्स शोधल्या आहेत.

ग्रीन टी

ग्रीन टीचा समावेश तुम्ही आहारत करा. अनेक व्यक्तींना सकाळी उठल्यावर लगेचच चहा प्यावा असं वाटतं. त्यांनी साखर आणि दूधाचा चहा वगळून ग्रीन टी घेतली पाहिजे. त्याने आपली अतिरिक्त चरबी कमी होते.

कडूलिंबाचा रस

कडूलिंबाचा रस विविध आजारांवर गुणकारी आहे. त्यामुळे वजन कमी करताना कडुलिंबाचा रस देखील प्यायला पाहिजे. कडुलिंबाच्या पानांत जास्त प्रोटीन आणि फायबर असतं. हा रस प्यायल्याने आपल्या भुकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

आळशीच्या बिया

आळशीच्या बिया ओमेगा-3 फॅटी अॅसिडने परिपूर्ण असतात. रोज रात्री या बिया पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर हे पाणी पिऊन घ्या. आळशीच्या बिया आणि हे पाणी देखील आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे. याने आपल्याला सतत भूक लागत नाही. पोट जास्त काळ भरलेलं राहतं.

दह्याचे सेवन करा

दही आहारात असणे आवश्यक आहे. कारण दही थंड असते. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने याचे सेवन केले पाहिजे. दह्यामधील घटक तुम्हाला वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतात.

शेंगदाणे

जर तुम्हाला सतत काम करताना थोडी भूक लागत असेल आणि तुम्ही वेफर्स, कुरकुरे असे स्नॅक्स खात असाल तर त्या ऐवजी भाजलेले शेंगदाणे आणि चणे खाण्यास सुरुवात करा.

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या देखील आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. हिरव्या पालेभाज्या जर तुम्ही दररोज खात असाल तर तुमच्या शरीरात जास्त चरबी तयार होणार नाही आणि तुमचे वजनही वाढणार नाही.

Tips For Lose Stubborn Belly Fat
Vidya Balan Weight loss : विद्या बालनचं वजन घटवणाऱ्या डाएटमध्ये आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com