Famous Temple In Maharashtra Saam Tv
लाईफस्टाईल

Famous Temple In Maharashtra: प्राचीन संस्कृतीचा वारसा म्हणून ओळखली जातात ही ५ मंदिरे, जाणून घ्या कुठे आहेत?

Shiv Temple In Maharashtra : भारतात महादेवाचे निवासस्थान असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत

कोमल दामुद्रे

Heritage Temple In Maharashtra :

संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला जितका मोठा इतिहास लाभला आहे , तितक्याच मोठ्या प्रमाणात पवित्र वास्तुशिल्पांचे देणे देखील लाभले आहे. मग ती वेरुळ-अजिंठा लेणी असोत किंवा अमृतेश्वर मंदिर.

वेदांनुसार, भारतात महादेवाचे निवासस्थान असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील मंदिरे केवळ तीर्थक्षेत्रेच नसून ती भारतातील द्रविड स्थापत्य शैलीपासून ते पेशवे राजवटीने परिभाषित केलेल्या मराठा स्थापत्य शैली पर्यंत संपूर्ण इतिहासाचे मूर्तिमंत दर्शन घडवतात. मुंबई विद्यापिठातील महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय परिषदेच्या तिसऱ्या वार्षिक पुरात्त्व परिषदेत पुरात्त्वशास्त्रज्ञ डॉ. कुरुश दलाल यांनी मुंबईच्या आसपासच्या परिसरातील प्रमुख पाच मंदिरांची यादी केली व तेथील काही मनोरंजक तथ्ये सांगितली. ही मंदिरे तुम्ही एकदा तरी पाहायलाच हवीत.

1. अंबरनाथ शिवालय

स्थळः अंबरनाथ

10 ते 13 व्या शतकादरम्यान शिलाहार घराण्याच्या चित्तराजाने या मंदिराची स्थापना केली होती. महाराष्ट्रात (Maharashtra) आढळणाऱ्या स्थापत्य शैलीचे एक उदाहरण देणारे हे मंदिर आहे. अनेकदा या मंदिराला हेमाड पंती शेलीचे मंदिर (Temple) म्हणून ओळखले जाते. हेमाड पंती मंदिरे यादव वंशाचे अधिकारी हेमाद्री पंत यांनी 1173 ते 1311 या काळात मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांवर राज्य केले होते. त्याकाळात बांधली गेली होती. परंतु हे मंदिर त्यापूर्वीपासूनच अस्तित्त्वात होते.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, मंदिराच्या बाहेरील भिंतींवर 'भूमी' नावाच्या आकृत्या एकावर एक थरांप्रमाणे मंदिराच्या त्रिकोणी शिखरापर्यंत कोरलेल्या आहेत. या त्रिकोणी शिखराच्या वरचा भाग निमुळता असल्यामुळे हा आकार शिखराकडे जाईपर्यंत लहान झाला आहे. मंदिराच्या पुढच्या बाजूस चार कोरिव स्तंभ आहेत जे मंदिराच्या भरगच्च शिखराला आधार देतात.

इतर पर्यटन स्थळेः अंबरनाथ येथे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आनंदसागर वॉटर पर्क आणि विष्णुबाग पर्यावरण थीम पार्क यांसारखे इतर ही पर्याय उपलब्ध आहेत.

2. अमृतेश्वर मंदिर

स्थळः इगतपूरी

अमृतेश्वर मंदिर 12 व्या शतकात बांधले गेलेले मराठा स्थापत्य मंदिर आहे. त्याच्या निर्जन स्थानामुळे परकिय आक्रमणांपासून ते नेहमी सुरक्षित राहिले. भारतातील इतर पारंपारिक मंदिरे फक्त एकद्वारी आहेत. तर मागील द्वार असणाऱ्या अगदी काही मंदिरांच्या यादित या मंदिराचा सामावेश होतो. या मंदिरातून आपण पुढच्या बाजूस उभे राहून मंदिराची मागची बाजू सहज पाहू शकतो. या रचनेला मंदिराच्या भौगोलिक परिस्थितीस लक्षात घेऊन तयार करण्यात आले होते. तेथे सतत येणाऱ्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहास वाट काढण्यासाठी मागील दरवाजा काढण्यात आला होता, जो आता नाहीसा झाला आहे.

मंदिराच्या आवारात एका मोठ्या दगडावर दोन वीर दगड आहेत. अमृतेश्वर मंदिराच्या आवारात असलेले हे वीर दगड गावावर आक्रमण केलेल्या गुराख्यांचा करण्यात आलेल्या यशस्वी पराभवाची कथा सांगतात. हे दगड युद्धादरम्यानच्या विजयाचे प्रतिक मानले जातात. मंदिराच्या आवारात दोन पेक्षा आधिक दगड असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते पण मंदिराच्या छताच्या दुरस्ती वेळी त्या दोन दगडांना मंदिराचे छत बांधण्यासाठी वापरण्यात आले. आपण आज ही ते दगड मंदिराच्या आतील बाजूस पाहू शकतो.

इतर पर्यटन स्थळेः सह्याद्रिच्या कुशीत वसलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 2000 वर्षे जुना किल्ला किल्ले रतनगडावर तुम्ही ट्रेकिंगचा (Trekking) आनंद घेऊ शकता. तर भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही तुम्ही बोटींगची मज्जा लुटू शकतात.

3. रुपनारायण मंदिर

स्थळः दिवेआगार

मुळ रुपनारायण मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे एक पारंपारिक कोकणी मंदिर वास्तुकलेनुसार बनवण्यात आलेले मंदिर आहे. अशा प्रकारची मंदिरे आताच्या काळात अस्तित्त्वात नाहीत. या प्रकारची मंदिरे चौरसाकारात बांधली गेली असून लाकडी खांबांनी मंदिराच्या छताला आधार देण्यात आला आहे. मंदिराच्या आवाराच्या परिसरात दिपस्तंभ उभारलेला आहे.

पुरातन काळातील एका अख्यायिकेनुसार, पोर्तुगिजांनी या मंदिरातील भगवान विष्णुंची मूर्ती जहाजामार्गे लंपास करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, जहाजास अर्ध्या रस्त्यात झालेल्या अपघातानंतर हि मुर्ती ढिगाऱ्यातून दिवेईआगारच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने लाल लॅटराइट दगडापासून बनवलेल्या नागारा शैलातील मंदिरातील शिल्पाचा जीर्णोद्धार केला. मराठा वास्तूकलेनुसार याचा चौकोनी पायावर उभा असलेला, शिखर हळूहळू बहिर्वक्रामध्ये आतील बाजूस झुकलेला आहे.

इतर पर्यटन स्थळेः जंजिरा बेट किल्ल्याला भेट देण्यासाठीचे दिवेआगार हे प्रवेशद्वार आहे. दिवेआगारापासून 20 किमी अंतरावर हरीहरेश्वर सारखा आणखी एक विलक्षण समुद्र किनारा आहे. दिवेआगार हे प्रमुख समुद्रकिनार्यासाठी ओळखले जाते.

4. कैलाश मंदिर

स्थळः संभाजिनगर

भारतातील सर्वात मेठ्या मोनोलिथिक मंदिरांपैकी एक असलेले कैलाश मंदिर, 8 व्या शतकात राष्ट्रकुट घराण्याचा राजा कृष्णाने बांधले होते. हे मंदिर संभाजिनगर येथील प्रसिद्ध 34 लेण्यांपैकी एक आहे. या लेण्यांना वेरूळ लेणी म्हाणून ओळखले जाते.

या मंदिराची विशेषता म्हणजे या मंदिराचे बांधकाम खडकाच्या वरच्या बाजूपासून सुरू करून आतील बाजू कोरण्यात आली होती. हि संपूर्ण संरचना पूर्ण होण्यासाठी 20 वर्षांचा कालावधी लागला. पिरॅमिडसारखी रचना असलेले, व ठराविक द्रवीडीयन शैलीत बांधले गेले आहे. मंदिराला दोन मजली प्रवेशद्वारे असून ती 'यू' आकाराच्या अंगणात उघडतात. मंदिराच्या प्रांगणात नंदी मंडप( नंदीचे निवासस्थान, शिवाची पायरी) आणि सात मीटर उंच मुख्य शिव मंदिर देखील आहे.

इतर पर्यटन स्थळेः संभाजिनगरमध्ये तुम्ही 2 किमी अंतरावर असलेल्या वेरुळ अजिंठा लेण्यांना देखील तुम्ही भेट देऊ शकता. त्याचबरोबर बीबीका मकबरा सारख्या ठिकाणी देखील तुम्ही जाऊ शकता.

5. त्र्यंबकेश्वर

स्थळः नाशिक

1300 वर्षांपर्यंत महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या यादव घराण्यानंतर, अल्लाउद्दीन खिलजीने अनेक आक्रमणे करून महाराष्ट्रातील अनेक मंदिरे नष्ट केली होती, त्यानंतर 1600 च्या दशकात मराठा घराण्याच्या पेशव्यांनी मराठा वास्तूकलेनुसार मंदिरे बांधण्यास सुरूवात केली. त्र्यंबकेश्वर हे या शेलीत बांधले गेलेले पहिले मंदिर आहे. तसेच भारतातील 12 जोर्तिलिंगापैकी हे एक असून, 15 व्या शतकात बाळाजी बाजीराव पेशवे यांनी बनवले होते.

काळ्या बेसालट खडकापासून बनविण्यात आलेले हे मंदिर हेमाडपंथी वास्तूकला व भूमिजा शैलीचा प्रभाव दर्शवते. तसेच हे गोदावरी नदीचे उगमस्थान देखील आहे.

या मंदिराच्या शिखराच्या विशिष्ट रचनेत मराठा स्थापत्याकलेचा प्रभाव दिसून येतो. या मंदिरात लहान शिखर हे समकेंद्रित असून मोठे शिखर हे मुख्य शिखर आहे. एका आख्यायिकेनुसार, मंदिराच्या आतील पूर्वाभिमुख शिवलिंग नासक हिऱ्याने सुशोभित केले होते, जो भगवान शंकरांचा तिसरा डोळा असल्याचे मानले जाते. हा निळा हिरा तेलंगणा प्रदेशातून मिळाला होता. 1818 च्या शेवटच्या मराठा-ब्रिटिश युद्धात ब्रिटिशांनी मराठ्यांना हरवून हा हिरा जिंकून मराठा राजवटीचा अंत केला होता.

इतर पर्यटन स्थळेः हे मंदिर नाशिकपासून 28 किमी अंतरावर आहे. त्याचबरोबर येथे सुला आणि सोमा व्हाइनयार्ड्स सारख्या अनेक द्राक्षबागांची घरे आहेत. त्याचबरोबर तुम्ही येथील पांडवलेणी लेणी आणि गंगापूर धरणाला देखील भेट देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?

Naga Chaitanya Birthday : नागा चैतन्य 'या' अभिनेत्रीला किस करताना घाबरला, स्वतः सांगितला होता किस्सा

Assembly Result : काही तरी मोठी गडबड आहे, महाराष्ट्राच्या सध्याच्या निकालावर ठाकरे गटाच्या नेत्याला शंका

Tanvi Mundle Age: मराठमोळ्या अभिनेत्रीचं खरं वय किती, प्रसिद्ध मालिकेत करतेय काम

Baramati Assembly Election Result: बारामतीमध्ये अभिजीत बिचकुलेंना २ फेरीत फक्त ९ मतं, पवार काका-पुतण्यांना दिलं होतं आव्हान

SCROLL FOR NEXT