Sakshi Sunil Jadhav
बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार त्याच्या कामातून नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकत असतो. त्याचे चाहते त्याला पाहण्यासाठी नेहमीच उत्सूक असतात.
अभिनेता अक्षय कुमार सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे त्याचा नवा चित्रपट नाही तर त्याची एक मुलाखत आहे.
पापाराझी हे नेहमीच अभिनेत्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाहत असतात. कधीकधी ते येतील त्या ठिकाणी जाऊन त्यांचे फोटो काढत असतात, व्हिडीओ व्हायरल करत असतात.
अभिनेता अक्षय कुमारने याच बद्दल एक मोठी गोष्टी सांगितली आणि सिनेसृष्टीत चर्चेचा विषय बनला आहे.
अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या एका मुलाखतीत पापाराझींबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं. त्यामध्ये त्याने पापाराझींकडून फोटो काढण्याबाबत कोणतीही अडचण नसल्याचं स्पष्ट केलं. त्याचसोबत एक मोठी सांगितली.
अभिनेता अक्षय कुमार म्हणाला, ''एका फोटोग्राफरला माझ्या एका फोटोसाठी जवळपास ३५०० ते ४००० रुपये मिळतात.''
पुढे म्हणाला माझा फोटो काढल्याने जर एखाद्या फोटोग्राफरचे घर चालत असेल, तर मला त्यात काहीच समस्या नाही, असेही त्यांनी नमूद केले.
पब्लिकमध्ये कुटुंबासोबत बाहेर गेल्यावर पूर्ण प्रायव्हसीची अपेक्षा करणं योग्य नाही, असे त्यांचे मत आहे. “मी उभा राहून फोटो काढू दिला तर त्यात काय चुकीचे आहे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पापाराझींसोबत चांगले संबंध ठेवण्याबाबत अक्षय कुमार ओळखला जातो आणि ते अनेकदा हसत-खेळत फोटोसाठी पोझ देताना दिसतात.