

महाराष्ट्रात गॅस सिलिंडर टंचाईवरून राजकीय वाद पेटला.
आंतरराष्ट्रीय तणावाचा पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त.
महापौर रितू तावडे यांनी टंचाईसाठी ठाकरे सेनेवर खापर फोडलंय.
महाराष्ट्रामध्ये गॅस टंचाई आहे, पण मुख्यमंत्री म्हणतात की, विरोधक चुकीचं नॅरेटिव्ह तयार करत आहेत. पण जर टंचाई नाही असं त्यांचं म्हणण असेल तर रांगा का दिसत आहेत. लोक रस्त्यावरती का दिसत आहेत, असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला विचारला आहे.
इराण-इस्रायल युद्धामुळे देशावर मोठा परिणाम होतोय. महाराष्ट्रात देखील गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं राजकारण तापलंय. राज्यात गॅसचा तुटवडा असून मुख्यमंत्री खोटं का बोलतायत? असा सवाल नाना पटोलेंनी केला. दुसरीकडे छगन भुजबळांनी कोणीही पॅनिक स्थिती निर्माण करू नये, असं आवाहन केलं. तर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी टंचाईसाठी ठाकरे सेनेवर खापर फोडलंय. आता उद्धव ठकारेंवर सरकारला सवाल विचारत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंय.
उद्धव ठकारे म्हणाले की, फक्त मुंबईमधील तीस ते ४० टक्के रेस्टॉरंट आता बंद झाली आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे जर सर्वसामान्य जनता होरपळत असेल आणि त्या जनतेच्या यातना मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पोहोचत नसेल तर त्यांच्या यंत्रणेमध्ये फार मोठा काहीतरी गलथानपणा सुरू आहे. जो जनतेचं दुःख किंवा जनतेच्या व्यथा जाणून घेत नाही किंवा जाणून सुद्धा त्या तशा नाहीच आहेत, असं मानणारे मुख्यमंत्री जर का आपल्या राज्याला लाभले असतील तर कठीण आहे राज्याचे अशी कोपरखळीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना मारली आहे.
मुंबईतील गॅस तुटवड्याबाबत महापौर रितू तावडे यांनी आरोप केला की, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अफवा पसरवली आहे. मुंबईमध्ये कुठेही गॅस तुटवडा नाही. मुंबईकरांना घाबरवरून माफियांकडून काळा बाजार चालवला जात आहे, असं महापौर तावडे म्हणाल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्रात सिलिंडरसाठी ठिकठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र दुसरीकडे विरोधक अफवा पसरवतंय असा आरोप सत्ताधारी करत आहेत. मात्र जमिनीवरचं चित्र हेच सांगतंय की राज्यात गॅसचा तुटवडा आहे. याच मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्य आणि केंद्र सरकावर टीकास्त्र डागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.