

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये कार आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात
लखनऊ-दिल्ली महामार्गावर भीषण अपघात
कार ट्रॅक्टरखाली घुसल्याने चार तरुणांचा मृत्यू
नैनीतालच्या तरुणांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये भयंकर रस्ते अपघात झाला. या अपघातामध्ये ४ तरुणांचा मृत्यू झाला. हे सर्व तरुण कारने दिल्लीला जात होते. या अपघातामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ-दिल्ली नॅशनल हायवेवर हा अपघात झाला. कार रामपूरवरून दिल्लीला जात होती. भरधाव कारने ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. कार ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खाली घुसली. या अपघातामध्ये ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व तरूण नैनीताल जिल्ह्यातील रहिवासी होते. या अपघातामुळे तरुण राहत असलेल्या नैनीताल येथील परिसरात शोककळा पसरली.
पोलिसांनी सांगितले की, सोमवारी सकाळी मूंढापांडे क्षेत्रातील मनकरा वळणावर भरधाव कारने विटांनी भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली. कार थेट ट्रॅक्टरखाली घुसली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यात आले. कारमधील पाचही तरुण गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ मूंढापांडे सीएचसी रुग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी चार तरुणांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
अपघातामध्ये जखमी झालेल्या एका तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये द्याल रावत, अनिल नेगी, सुंदर सैनी, भुवन भंडारी या चौघांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये यशदीप पांडे हा कारचालक गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलिस ट्रॅक्टर चालकाचा शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.