Pune Accident: चांदणी चौकात भरधाव डंपरने रिक्षाला उडवलं,५ शाळकरी विद्यार्थ्यी थोडक्यात बचावले

Pune Accident: पुण्यातील चांदणी चौकात डंपर आणि रिक्षाचा अपघात झालाय. या अपघातात पाच शाळकरी विद्यार्थी जखमी झाले आहेत. रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळालीय.
Pune Accident
Pune Accidentsaam Tv
Published On

Dumper And Autorickshaw Accident :

पुण्यातील चांदणी चौकात भरधाव डंपरने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षाला धडक दिली. या रिक्षेत शाळकरी विद्यार्थी होते, ते सर्व विद्यार्थी एमआयटी ग्रुप स्कूलचे असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातात रिक्षेतील ५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर ही रिक्षा विद्यार्थ्यांना घेऊन मुंबई बेंगळुरू महामार्गावरून जात होती. मार्गावरील भुयारी मार्गातील रिक्षा आणि डंपरची धडक झाली. रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. जखमी झालेल्या ५ विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांना एशियन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर एका विद्यार्थ्याला दुसऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुणे-नगर महामार्गावर गॅस टँकरचा अपघात

सोमवारी पुणे-नगर महामार्गावरील वडगाव शेरी परिसरात पहाटेच्या वेळी गॅस वाहून नेणारा टँकर उलटून अपघात झाला होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Pune Accident
Amravati Accident: भीषण अपघात! ३५ मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटला; ९ जण गंभीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com