Amravati Accident: भीषण अपघात! ३५ मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटला; ९ जण गंभीर

Accident News: अपघातात ट्रॅक्टरमधील ९ मजूर गंभीर जखमी झालेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Amravati  Accident News
Amravati Accident NewsSaam tv
Published On

अमर घटारे, अमरावती| ता. १२ डिसेंबर २०२३

Amravati Accident News:

अमरावतीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अमरावीच्या दर्यापूर ते भातकुली मार्गावरील थिलोरी फाट्याजवळ मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टरमधील ९ मजूर गंभीर जखमी झालेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मजुरांनी भरलेला ट्रॅक्टर शेतातून दर्यापुरकडे जात होता. यावेळी अमरावतीच्या (Amaravati) दर्यापूर ते भातकुली मार्गावरील थिलोरी फाट्याजवळ या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला.

या अपघातात (Accident) ट्रॅक्टरमधील ३५ पैकी ९ जण गंभीर जखमी झालेत. जखमींना तातडीने दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामधील काही मजुरांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amravati  Accident News
Satara News: पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

साताऱ्यामध्ये भीषण अपघात..

साताऱ्यातील (Satara) पुणे बंगलोर महामार्गावर (Pune Banglore Highway) सोमवारी रात्रीच्या सुमारास ट्रक आणि ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टरवरील महिला आणि पुरुष ठार तर ट्रकमधील एक जण जखमी झाला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

Amravati  Accident News
Weather Update: उत्तर भारतात थंडीची लाट, पण 'या' राज्यांमध्ये पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com