Uttarakhand Tunnel Accident Update: ड्रिलिंग.. रुग्णवाहिका ते हॉस्पिटल.. उत्तरकाशी बोगद्यातील रेस्क्यू ऑपरेशन कुठपर्यंत पोहोचलं? 10 अपडेट्स

Uttarakhand Tunnel Accident Update: उत्तराखंडमध्ये बोगद्यात दरड कोलळल्यामुळे गेल्या १२ दिवसांपासून ४१ कामगार अडकून पडले आहेत. त्यांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. देशी विदेशी संस्था या कामात गुंतल्या आहेत.
Uttarakhand Tunnel Accident Update
Uttarakhand Tunnel Accident UpdateSaam Digital
Published On

Uttarakhand Tunnel Accident Update

उत्तराखंडमध्ये बोगद्यात दरड कोलळल्यामुळे गेल्या १२ दिवसांपासून ४१ कामगार अडकून पडले आहेत. त्यांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. देशी विदेशी संस्था या कामात गुंतल्या आहेत. हे काम आता अंतिम टप्प्यात असून कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ १० मीटर अंतर शिल्लक असल्याची माहिती बचाव पथकांनी दिली आहे. चा मोहिमेतील ड्रिलिंगपासून रुग्णवाहिका ते हॉस्पिटलपर्यंतची सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊयात.

1. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी मातीच्या ढिगाऱ्यातून ड्रिलिंगकरून रुंद पाईप घालण्यात आला आहे. हे काम करणारी ऑगर मशीन एका तासात ३ मीटर ड्रिलिंग करते. दरम्यान आज पहाटे ड्रिलिंग दरम्यान कठीण धातू लागला. हा धातू हटवण्यासाठी मेटल कटरचा वापर करण्यात आल्यानंतर ड्रिलिंग पुन्हा सुरू झाले.

2. ऑगर मशीन जसजसे ड्रिलिंग करते, तसे ढिगाऱ्यातून पाईप पुढे ढकलले जातात. एक पाईप पूर्ण घातल्यानंतर दुसरा वेल्डींग केला जातो. पाईपचा शेवटचा भाग वेल्डींग करण्यासाठी दिल्लीतून वेल्डर आणण्यात आले आहेत. ड्रिलिंग पूर्ण होईपर्यंत ते या ठिकाणी उपस्थित असणार आहेत.

3. ४१ कामगार तब्बल १२ दिवसांपासून बोगद्यात अडकले आहेत. आतापर्यंत त्यांना जेवण आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र कामगारांचा बोगद्यात अडकलेला वेळ पाहता एवढंच पुरेस नाही. बोगद्यातील तापमान आणि त्यांच्यावर होणारा परिणाम यांचाही विचार केला जात आहे.

4. कामगार अडकलेल्या ठिकाणी पाईप होपोचल्यानंतर एक डॉक्टर त्यांच्यापर्यंत पाईपमधून पोहोचेल. त्यानंतर डॉक्टर त्यांची तपासणी करतील. वेल्डिंग जॉइंट्सवर तीक्ष्ण कडा आहेत. त्यावरून कसे क्रॉल करायचे त्याचे प्रात्यक्षिक कामगारांना दाखवले जाईल. इकडे पाईपच्या बाहेर स्ट्रेचरची सोय करण्यात आली आहे. जेणेकरून कामगारांना तात्काळ रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवता येईल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

५. एनडीआरएफच्या देखरेखाली कामगार पाईपमधून बाहेर येतील. या कामगारांना चिन्यालिसौर येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. कामगारांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

६. ड्रिलिंगनंतर आतापर्यंत ४४ पाईप टाकण्यात आल्या आहेत. बचाव मोहिमेदरम्यान ढिगाऱ्याखाली लोखंडी रॉड आढळले. जे मशीनला कापता आले नाहीत. त्यामुळे एनडीआरएफच्या जवानांनी हे रॉड कापल्यानंतर पुन्हा मशीनचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती बचाव टीमचे अधिकारी हरपाल सिंह यांनी दिली.

Uttarakhand Tunnel Accident Update
Nepal Earthquake : नेपाळमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के; 4.5 तीव्रतेच्या धक्क्यांनी हादरला परिसर

७. दुर्घटना घडलेला हा बोगदा केंद्राच्या महत्त्वाकांक्षी चारधाम प्रकल्पाचा एक भाग आहे. उत्तरकाशी आणि यमनोत्रीला जोडणाऱ्या या मार्गावर सिल्क्यारा आणि दांडलगाव दरम्यान या बोगद्याचं काम सुरू आहे. जवळपास ४.५ किमी या बोगद्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे.

८. या बोगद्यात १२ नोब्हेंबर रोजी दरड कोसळल्यामुळे कामगार अडकले आहेत. कामगार ज्या भागात अडकलेत तो भाग ८.५ मीटर उंच आणि २ किमी लांब आहे. दिलासादायक बाब म्हणजे कामगार अडकलेल्या ठिकाणी वीज आणि पाण्याची सोय आहे.

९. सिल्क्यारा आणि दांडलगावचा हा भाग हिमालयाच्या पर्वतरागांमध्ये येतो. येथील भौगोलिक स्थिती आणि माती वेगळ्या प्रकारची आहे. त्यामुळे गेल्या १२ दिवसात बचाव कार्यात अनेक अडथळे निर्माण झाले.

१०. सतत येणाऱ्या अडथळ्यांमुळे कामगारांपर्यंत पोहचण्याची निश्चित वेळ देता येत नाही. सध्या सुरू असलेले काम अडथळ्याशिवाय पार पडले तर काही तासातच कामगारांना बाहेर काढले जाऊ शकते, असे हरपाल सिंह यांनी म्हटले आहे.

Uttarakhand Tunnel Accident Update
DeepFakeबाबत केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, नवीन कायदा आणण्याच्या तयारीत; आजच्या बैठकीत काय झालं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com