अमर घटारे, प्रतिनिधी|ता. १२ डिसेंबर २०२३
गेल्या दिड महिन्यापासून सुरू असलेली आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा आज नागपूरमध्ये धडकणार आहे. १० ते १२ जिल्ह्यांमधून तब्बल ८०० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आज (१२, डिसेंबर) नागपूरमध्ये या संघर्ष यात्रेची सांगता होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वतः या सांगता सभेत सहभागी होणार असून यावेळी शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाग द्या, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत जाहीर करा, तसेच राज्यातील युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न, विविध शैक्षणिक समस्या, स्पर्धा परिक्षांच्या रखडलेल्या नियुक्त्या या आणि इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याकडून संघर्ष यात्रा काढण्यात आली.
दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यामधून (Pune) या संघर्ष यात्रेला सुरूवात झाली होती. या युवा संघर्ष यात्रेला युवकांचा तसेच शेतकऱ्यांचाही मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. राज्यातील दहा ते बारा जिल्ह्यातून 800 किलोमीटरचा प्रवास करून पुणे ते नागपूर 'युवा संघर्ष यात्रा' नागपुरात धडकणार आहे. आज नागपूरमध्ये (Nagpur) या यात्रेची यात्रा होणार आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नागपूरमध्ये होणाऱ्या या सांगता सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेला शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आदी नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या सभेत शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.