Maharashtra Assembly Winter Session: ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरुन विधान परिषदेत घमासान! 'कोणालाही पाठीशी घालणार नाही...' फडणवीसांचे आश्वासन

Devendra Fadanvis on Lalit Patil Case: "अटक करायचं असेल तर मागेपुढे पाहणार नाही. या केसमध्ये थेट सहभाग होता त्यांना बडतर्फ केलं आहे.." असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
Maharashtra Assembly Winter Session
Maharashtra Assembly Winter SessionSaamtv
Published On

Maharashtra Assembly Winter Session:

नागपुरमध्ये सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात विविध प्रकरणावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. आज (मंगळवार, १२ डिसेंबर) विधान परिषदेत राज्यभरात वाढलेला अंमली पदार्थांचा सुळसुळाट आणि ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये खडांजगी झाली. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही.. असे आश्वासन दिले.

ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणाचे राज्याच्या हिवाळी अधिवेशनात पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचाही हात असू शकतो त्यामुळे ललित पाटील प्रकरणात सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेस आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.. असे आश्वासन दिले.

काय म्हणाले फडणवीस?

"अंमली पदार्थ प्रकरणी संगनमत हे आंतराष्ट्रीय रॅकेट आहे. संजीव ठाकूर यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. अटक करायचं असेल तर मागेपुढे पाहणार नाही. या केसमध्ये थेट सहभाग होता त्यांना बडतर्फ केलं आहे.." असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यावेळी म्हणाले. तसेच या प्रकरणात ४ पोलिसांना बडतर्फ करण्यात आले तर ६ पोलिसांना निलंबीत करण्याची करवाई करण्यात आल्याची माहितीही फडणवीसांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Assembly Winter Session
Chhagan Bhujbal News: 'ती केस आम्हीही विसरलो अन् ईडीही विसरली...' महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील याचिका मागे घेतल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया

ससूनमध्ये ९ महिने पाहुणचार कोणाच्या परवानगीने?

दरम्यान, "ललित पाटीलचा ९ महिने ससून रुग्णालयात पाहुणचार कोणाच्या परवानगीने केला. यामागे कोणाचा हात आहे? याचा तपास व्हायला हवा. यासाठी ललित पाटीलची नार्को टेस्ट करा.." तसेच डॉक्टर देवकाते यांचीही नार्को टेस्ट करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी केली. तसेच यासंबंधी ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना अटक करणार आहात का? हे प्रकरण सीबीआयकडे देणार आहात का? असे सवालही त्यांनी उपस्थित केले. (Latest Marathi News)

Maharashtra Assembly Winter Session
Yavatmal News: 'पिकविम्याचे ५२ रुपये मिळालेत, पोलीस संरक्षण द्या..' शेतकऱ्याची मागणी, रक्कम नेण्यासाठी चक्क तिजोरीच आणली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com