सुरज मसुरकर, नागपूर
नागपुरात शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरु आहे. आज सोमवारी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांची ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून उलट तपासणी झाली. यावेळी उदय सामंत शिवसेनेच्या पक्ष प्रमुख पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)
देवदत्त कामत : तुम्ही प्रतिज्ञापत्रात लिहिलेलं आहे की, 'पक्षाच्या बहुसंख्य लोकप्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं' हे चूक आणि तथ्यहीन आहे.
उदय सामंत - हे चुकीचं आहे. मला एक महत्त्वाची गोष्ट सांगावी वाटतेय. 1999 च्या अमेंडमेंटमध्ये पक्षप्रमुख हे पद नसताना देखील पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून उद्धव ठाकरे यांचा आम्हाला सर्वांना आदर होता. म्हणून पक्षप्रमुख असा उल्लेख आमच्याकडून होत होता. तरी त्यांचा आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क नव्हता. त्यामुळे लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी आपल्या सर्व अडीअडचणी गेली कित्येक वर्षे शिवसेनेचे नेते म्हणून काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडायचे. म्हणून शिवसेना नेते म्हणून एकनाथ शिंदे सर्वांना न्याय द्यायचे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
देवदत्त कामत - एकनाथ शिंदे हे केव्हा आणि कसे नेते बनले, याची आपल्याला कल्पना नाही असे आपल्याला म्हणायचे आहे का?
उदय सामंत : कल्पना नाही.
देवदत्त कामत - तुम्ही म्हटला की पक्षाचे लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारी मांडत होते. हा कुठला काळ होता?
उदय सामंत - तसं बरंच वर्षांपासून पण आता आठवत नाही.
देवदत्त कामत - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे असं तुम्ही म्हणत आहात, तेव्हा ते शिवसेनेचे एकमेव नेते आहेत की अनेकांपैकी एक आहेत?
उदय सामंत - सुरुवातीच्या उत्तरात शिवसेना नेत्यांची नावं सांगितली होती. त्यात एकनाथ शिंदे यांचंही नाव होतं. 2004 रोजी मी जेव्हा विधानसभेचा सदस्य झालो. त्यावेळी पासून ते शिवसेनेत आहे.
देवदत्त कामत - शिवसेना पक्षात नेते पदाच्या निवडीसाठी काही प्रक्रिया आहे का?
उदय सामंत - मला हे माहिती नाही.
देवदत्त कामत - मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही रेकॉर्डवर कोणतंही डॉक्युमेंट सबमीट केलेलं नाही, ते जे सांगू शकेल की 2018 च्या आधी एकनाथ शिंदे हे शिवसेना राजकीय पक्षाचे नेते होते. हे बरोबर आहे का?
उदय सामंत - हे चूक आहे.
देवदत्त कामत - 23 जानेवारी 2018 रोजी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे नेते केलं. हे बरोबर आहे का?
उदय सामंत - मला आठवत नाही.
देवदत्त कामत - क्रमांक 56 चे उत्तर देताना तुम्ही म्हटलंय की "we address Uddhav Thackeray as Paksha pramukh.". 'पक्ष प्रमुख' हा शब्द कुठून घेतला?
उदय सामंत - काही नेते मंडळींची इच्छा होती आणि आदरापोटी सर्वांनी ते उचलून धरले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.