Lalit Patil Narcotics Case: अमली पदार्थ तस्करीप्रकरणी मोठी अपडेट, ललित पाटीलसह चार जणांना १० दिवसांची पोलीस कोठडी

Lalit Patil Narcotics Case:अमलीपदार्थ तस्करीत महत्त्वाचा सहभाग असल्याने ललित पाटीलसह चौघांना न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ललित पाटीलसह रोहित चौधरी, झिशान शेख, हरीश पंत याच्या चौकशीसाठी सरकारी वकिलांनी पोलीस कोठडी वाढवून मागीतली होती.
Lalit Patil Narcotics Case
Lalit Patil Narcotics CaseSaam Digital
Published On

Lalit Patil Narcotics Case

अमलीपदार्थ तस्करीत महत्त्वाचा सहभाग असल्याने ललित पाटीलसह चौघांना न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ललित पाटीलसह रोहित चौधरी, झिशान शेख, हरीश पंत याच्या चौकशीसाठी सरकारी वकिलांनी पोलीस कोठडी वाढवून मागीतली होती. त्यानंतर गुन्ह्याच स्वरूप लक्षात घेता न्यायालयानं या चौघांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयात हजर करण्यापूर्वी ललित पाटीलला नाशिकच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कार्यालयात आणलं होतं इथे त्याची चौकशी करण्यात आली. दरम्यान या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

अमलीपदार्थ तस्करीत मुख्य आरोपी ललित पाटील याच्यासह ११ जणांना अटक करण्यात होती. ललित पाटीलचे या सर्व आरोपींशी कनेक्शन होते. तसेच आरोपींनी नाशिक येथे अमलीपदार्थांचा कारखाना तयार केला आणि ललित पाटीलच्या मदतीने पुण्यात अमलीपदार्थांची तस्करी केल्याचे तपासात समोर आले होते. यानंतर अमलीपदार्थ तस्करीचं मोठं रॅकेट समोर आल्यानंतर राज्यात खळबळ माजली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lalit Patil Narcotics Case
NIA Raids Today In Maharashtra: महाराष्ट्र, कर्नाटकात ४० हून अधिक ठिकाणी NIA चे छापे, भिवंडी-पडघ्यातून १५ जण ताब्यात

दरम्यान काल शुक्रवारी या प्रकरणाच्या तपासासाठी नाशिक पोलीस भूषण पानपाटील आणि अभिषेक बलकवडेला शिंदे गावात घेऊन गेले होते. नाशिकच्या शिंदे पळसे परिसरात भूषण आणि अभिषेक अमली पदार्थांचा कारखाना चालवत होते. ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पानपाटीलच्या सांगण्यावरून भूषण पानपाटीलने हा कारखाना सुरू केला होता. धाड टाकल्यानंतर हा कारखाना पोलिसांनी सील केला होता. दरम्यान शुक्रवारी पोलिसांनी सील केलेल्या या कारखाना आणि गोडाऊनच्या ठिकाणी दोघांना आणून ड्रग्स रॅकेटबाबत चौकशी केली.

Lalit Patil Narcotics Case
BJP Vs Saamana Editorial: ...तर तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही; सामनातून केलेल्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com