उबाठाचे नेते उद्धव ठाकरे आणि त्यांचे संपादक संजय राऊत यांनी त्यांच्या अडीच वर्षातील महाविकास आघाडीचं ऑडिट केलं असतं तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे उबाठा ‘एनपीए‘त गेली आहे. तुम्हाला आता नैतिकतेच्या गप्पा मारण्याचा अधिकार उरला तरी कुठे?, असा खरमरीत सवाल भाजपकडून उद्धव ठाकरेंना विचारण्यात आलाय. देवेंद्र फडणवीस यांच्यावर सामनातून केलेल्या टीकेला भाजपनं एक्स अकाउंटवर जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी मोदी-शहांना एक पत्र लिहून "पटेलांना भेटणे देशहिताचे नाही. भाजपच्या (BJP) नैतिकतेत ते बसत नाही. साहेब, पटेलांना लांब ठेवा" असे सांगण्याचे धाडस दाखवावे. तरच मलिकांच्याबाबतीतील त्यांच्या नैतिकतेच्या उचक्या खऱ्या, नाहीतर पैशाचे सोंग व भाजपचे नैतिकतेचे ढोंग सारखेच. त्यांच्या नैतिकतेचे ऑडिट करावेच लागेल, अशी जहरी टीका सामना अग्रलेखातून करण्याता आली होती.
या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल झाला, ते जेलमध्ये गेले, सध्या वैद्यकीय कारणांमुळे त्यांना जामीन मिळाला. पण प्रफुल्ल पटेल यांचं प्रकरण वेगळं आहे. त्यांच्यावर ना गुन्हा दाखल आहे, ना ते जामिनावर बाहेर आहेत. उद्या प्रफुल्ल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता, तर जी भूमिका नवाब मलिक यांच्याबाबत, तीच प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत ही असती. "
"उबाठा गटानं नैतिकतेचं ढोंग अजिबात रचू नये. नवाब मलिक तुरुंगात असून सुद्धा शेवटपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत तुम्ही दाखवली नव्हती. हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय. त्यामुळे ऑडिट करायचंच असेल तर तुमच्या अडीच वर्षाच्या काळातील नैतिकेतेचं करा. तो रिपोर्ट पाहून तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही, अशी जहरी टीका भाजपकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर करण्यात आलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.