National Politics News: भूपेश बघेल यांना हायकमांडने बोलवलं दिल्लीत, छत्तीसगडमध्ये आता विरोधी पक्षनेते कोण होणार?

Bhupesh Baghel: भूपेश बघेल यांना हायकमांडने बोलवलं दिल्लीत, छत्तीसगडमध्ये आता विरोधी पक्षनेते कोण होणार?
National Politics News
National Politics NewsSaam Tv
Published On

National Politics News:

छत्तीसगडसह पाच राज्यांतील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचा आढावा घेण्यासाठी भूपेश बघेल आणि छत्तीसगड काँग्रेसचे प्रदेश प्रमुख दीपक बैज गुरुवारी दिल्लीला रवाना होणार आहेत. उद्या (शनिवारी) दिल्लीत एक महत्त्वाची बैठक होणार असून त्यात काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह पाच राज्यांचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे. या बैठकीत छत्तीसगडच्या विधानसभा विरोधी पक्षनेत्याच्या नावावर निर्णय होऊ शकतो.

या वर्षी 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारतीय जनता पक्षाने (भाजप) छत्तीसगडमध्ये 90 पैकी 54 जागा जिंकून सत्तेत शानदार पुनरागमन केले आहे. तर 2018 च्या निवडणुकीत 68 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी 35 जागा मिळाल्या. गोंडवाना गणतंत्र पार्टी (GGP) राज्यात एक जागा जिंकण्यात यशस्वी ठरली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

National Politics News
Pimpri-Chinchwad Fire : पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू

छत्तीसगड काँग्रेस संपर्क शाखा प्रमुख सुशील आनंद शुक्ला यांनी सांगितले की, भूपेश बघेल आणि दीपक बैज गुरुवारी संध्याकाळी दिल्लीला रवाना होतील. आनंद शुक्ला म्हणाले, 'मला सांगितल्याप्रमाणे छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराम या पाचही राज्यांच्या निवडणूक निकालांवर आढावा बैठक होणार आहे.'  (Latest Marathi News)

या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते भूपेश बघेल यांनी भाजप नेते आणि त्यांचे पुतणे विजय बघेल यांचा 19,723 मतांनी पराभव करत पाटणची जागा जिंकण्यात यश मिळविले. जनता काँग्रेस छत्तीसगड (जे) अध्यक्ष अमित जोगी 4822 मतांसह पाटणमध्ये तिसऱ्या स्थानावर आहेत. मात्र, दीपक बैज यांचा चित्रकोट मतदारसंघातून भाजपच्या विनायक गोयल यांच्याकडून 8370 मतांनी पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांसह 31 विद्यमान आमदारांचा पराभव झाला आहे.

National Politics News
Mahua Moitra News: मोठी बातमी! तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा लोकसभेतून बडतर्फ

दरम्यान, छत्तीसगडमधील काँग्रेसच्या एकूण 13 मंत्र्यांपैकी केवळ चार मंत्री निवडणूक जिंकले आहेत. ज्यात भूपेश बघेल, कावासी लखमा, उमेश पटेल आणि अनिला भेडिया यांचा समावेश आहे. विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चरणदास महंता यांनीही आपली विधानसभा जागा वाचवण्यात यश मिळवले. विरोधी पक्षनेतेपदी भूपेश बघेल किंवा चरणदास महंत यांची निवड होईल असे मला वाटते, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com