Yavatmal News: 'पिकविम्याचे ५२ रुपये मिळालेत, पोलीस संरक्षण द्या..' शेतकऱ्याची मागणी, रक्कम नेण्यासाठी चक्क तिजोरीच आणली

Yavatmal Farmer on Pik Vima Amount: यवतमाळमधील एका शेतकऱ्याला 52.99 इतके पिकविम्याचे पैसे मिळाल्यानंतर त्याने पोलीस अधिक्षकांना पत्र लिहून थेट संरक्षणाची मागणी केली आहे. तसेच रक्कम घरी नेण्यासाठी चक्क बैलगाडीतून तिजोरीच घेऊन पोलीस कार्यालयावर धडक दिली.
Yavatmal Farmer on Pik Vima News: Farmer in Yavatmal Received a Crop Insurance Payment of Rs 52.99
Yavatmal Farmer on Pik Vima News: Farmer in Yavatmal Received a Crop Insurance Payment of Rs 52.99 Saam Tv
Published On

Yavatmal Farmer on Pik Vima:

अतिवृष्टीमुळे यावर्षी खरीप हंगामात कापूस, तुर, सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकीकडे आस्मानी संकटाने बळिराजा हतबल झाला असतानाच पीक विमा कंपन्यांनी ३५, ५०, ९० रुपये नुकसान भरपाई दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

यवतमाळमधील एका शेतकऱ्याला 52.99 इतके पिकविम्याचे पैसे मिळाल्यानंतर त्याने पोलीस अधिक्षकांना पत्र लिहून थेट संरक्षणाची मागणी केली आहे. तसेच रक्कम घरी नेण्यासाठी चक्क बैलगाडीतून तिजोरीच घेऊन पोलीस कार्यालयावर धडक दिली.

Yavatmal Farmer on Pik Vima News: Farmer in Yavatmal Received a Crop Insurance Payment of Rs 52.99
Navi Mumbai Crime: माचिस दिली नाही म्हणून केली निर्घृण हत्या; धक्कादायक घटनेनं नवी मुंबईत खळबळ

काय आहे प्रकरण?

यवतमाळच्या (Yavatmal) घाटंजी तालुक्यातील शिवणी गावातील दिलीप राठोड यांच्या शेतातील कापूस आणि सोयाबीन पिकांचे अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले. त्याचीच भरपाई म्हणून त्यांना सरकारकडून फक्त रु. 52.99 इतकी पिकविम्याची रक्कम मिळाली. या प्रकाराने संतापलेल्या शेतकऱ्याने यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून किमान सहा कर्मचार्‍यांचे पोलीस संरक्षण मागितले आहे.

पीक नुकसानीची भरपाई म्हणून त्यांना मिळालेल्या रकमेतून शेती कर्जाची परतफेड करतील. आणि काही पैसे त्याच्या आजारी पत्नीच्या उपचारासाठी खर्च करेन. ही मोठी रक्कम मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे आणि मला पोलिस संरक्षणाची गरज आहे, असे पत्रामध्ये नमुद करत राठोड यांनी संताप व्यक्त केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Yavatmal Farmer on Pik Vima News: Farmer in Yavatmal Received a Crop Insurance Payment of Rs 52.99
Digestion Tips: जेवण पचत नाही? या टीप्स फॉलो करा १० मिनिटात जेवण पचेल

रक्कम नेण्यासाठी तिजोरीच आणली...

तसेच माझ्यासारख्या गरीब शेतकर्‍यांसाठी रु. 52.99 ही रक्कम ५० खोक्यांपेक्षा मोठी आहे. आता मला ती घरी नेण्याची काळजी वाटत आहे. घरी नेण्यासाठी मी माझी लोखंडी तिजोरी बैलगाडीतून जिल्हाधिकारी कार्यालयात आणली आहे. पण मला भीती वाटते. साऱ्या जगाची व चोरट्यांची नजर माझ्या पीकविम्याच्या रुपये ५२.९९ कडे लागली आहे. त्यामुळे ही रक्कम घरी नेण्यासाठी मला सहा पोलिस कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे," असे पत्रात म्हटले आहे. (Latest Marathi News)

Yavatmal Farmer on Pik Vima News: Farmer in Yavatmal Received a Crop Insurance Payment of Rs 52.99
Shivsena MLA Disqualification: आमदार अपात्रतेच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट; 'या' तारखेला अंतिम निर्णय येणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com