Amit Shah in Parliament: सभापती महोदय मला संरक्षण द्या, अमित शहांची सभागृहात मागणी; संसदेत नेमकं काय घडलं?

Amit Shah Parliament Speech: जम्मू-काश्मीर आरक्षण सुधारणा विधेयकावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
bjp amit shah vs Congress Mp manish tiwari in parliament jammu kashmir bill pok
bjp amit shah vs Congress Mp manish tiwari in parliament jammu kashmir bill pok Saam TV
Published On

Amit Shah Parliament Speech

जम्मू-काश्मीर आरक्षण सुधारणा विधेयकावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी अमित शहा यांनी वक्तव्य केलं असता, सभागृहात उपस्थित असलेले सर्व काँग्रेस खासदार अमित शहांवर तुटून पडले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

bjp amit shah vs Congress Mp manish tiwari in parliament jammu kashmir bill pok
Maharashtra Politics: राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, भावी मंत्र्यांमध्ये आनंदाची लाट; कुणाला मिळणार संधी?

अमित शहा (Amit Shah) यांचं भाषण सुरू असताना काँग्रेस खासदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. तसेच अमित शहांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी देखील त्यांनी केली. काँग्रेस खासदारांच्या आक्रमकतेमुळे संसदेच्या सभागृहात मोठा गदारोळ निर्माण झाला होता.

त्यानंतर अमित शहा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करत आपल्याला संरक्षण देण्याची मागणी केली. खरं तर दोन दिवस संसदेत जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेबाबत सुधारित विधेयकावर चर्चा सुरू होती. बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला.

याचवेळी त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लक्ष केलं. पंडित नेहरूंच्या काळात झालेल्या 2 चुकांमुळे काश्मीरला पुढचे अनेक वर्ष अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या, असा दावा अमित शहा यांनी आपल्या भाषणात केला.

अमित शहा यांनी नेहरूंवर टीका करताच संसदेत उपस्थित असलेले काँग्रेस खासदार चांगलेच संतापले. त्यांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी काहींनी अमित शहा यांच्या भाषणात देखील व्यत्यय आणला. यावेळी सभापती महोदय मला यांच्यापासून संरक्षण द्या, अशी मागणी अमित शहांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली.

अध्यक्ष महाराज मला संरक्षण हवे आहे, कृपया व्यवस्था करा जेणेकरून मी व्यवस्थित उत्तर देऊ शकेल. काँग्रेस खासदारांचा गोंधळ सुरू असल्याने मी उत्तर देऊ शकत नाही, असं अमित शहा म्हणाले. दरम्यान, अमित शहांच्या भाषणादरम्यान, काँग्रेस खासदार मनीष तिवारी बोलत होते आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला त्यांना गप्प करत होते.

bjp amit shah vs Congress Mp manish tiwari in parliament jammu kashmir bill pok
Aditya Thackeray: दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com