Maharashtra cabinet expansion date confirm Eknath Shinde Ajit Pawar BJP MLAs will Take oath after state assembly winter session 2023
Maharashtra cabinet expansion date confirm Eknath Shinde Ajit Pawar BJP MLAs will Take oath after state assembly winter session 2023Saam Tv

Maharashtra Politics: राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, भावी मंत्र्यांमध्ये आनंदाची लाट; कुणाला मिळणार संधी?

Maharashtra Cabinet Expansion: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात आपले नाव असेल का, याची उत्सुकता अनेक आमदारांना आहे.
Published on

Maharashtra Cabinet Expansion Latest News

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपुरातून सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील १० दिवस राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन आमने-सामने येत आहेत.

एकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष अधिवेशनावर लागलं असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळातून महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra cabinet expansion date confirm Eknath Shinde Ajit Pawar BJP MLAs will Take oath after state assembly winter session 2023
Aditya Thackeray: दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होणार?

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात आपले नाव असेल का, याची उत्सुकता भाजप, तसेच अजित पवार गट आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने आता कुणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार, याची वाटही आमदार पाहत आहेत. दरम्यान, नव्या मंत्रिमंडळात १४ मंत्र्याचा समावेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.

यामध्ये अजित पवार गटाला (Ajit Pawar) आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद आणि दोन राज्यमंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाकडून मकरंद आबा पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडून भरत गोगावले यांचं नाव चर्चेत आहे.

मागील काही दिवसांपासून भरत गोगावले नाराज असल्याची माहिती आहे. मंत्रिपदाची इच्छा ते सातत्याने बोलून दाखवत आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी पक्ष सरकारमध्ये सामील होण्यापूर्वी शिंदेंच्या आमदारांना १२ ते १३ मंत्रिपद आणि महामंडळ भेटण्याची शक्यता होती.

मात्र, ही शक्यता देखील आत्ता धूसर झालेली आहे. सर्वांच्याच गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार नाही, हे आमदारांना कळून चुकले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या गटात मोठया प्रमाणात नाराजी दिसत आहे. दरम्यान, आपल्या पक्षातील आमदारांची समजूत काढण्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यशस्वी होतात का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Maharashtra cabinet expansion date confirm Eknath Shinde Ajit Pawar BJP MLAs will Take oath after state assembly winter session 2023
IMD Rain Alert: शेतकऱ्यांनो काळजी घ्या, ऐन थंडीत मुसळधार पाऊस कोसळणार; 'या' जिल्ह्यांना झोडपणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com