IMD Rain Alert: शेतकऱ्यांनो काळजी घ्या, ऐन थंडीत मुसळधार पाऊस कोसळणार; 'या' जिल्ह्यांना झोडपणार

Maharashtra Weather Update: मिचाँग चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसण्याचा अंदाज आहे. येत्या ४८ तासांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
IMD Rain Alert in Next 48 hours marathwada vidarbha Maharashtra Many District Weather Update
IMD Rain Alert in Next 48 hours marathwada vidarbha Maharashtra Many District Weather UpdateSaam TV
Published On

IMD Rain Alert in Maharashtra:

बंगालच्या उपसागरात मिचाँग चक्रीवादळ तयार झालं आहे. या चक्रीवादळाने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांना मोठा तडाखा दिला आहे. चेन्नईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसण्याचा अंदाज आहे. येत्या ४८ तासांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

IMD Rain Alert in Next 48 hours marathwada vidarbha Maharashtra Many District Weather Update
Maharashtra Winter Session 2023: हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने येणार; राज्याचे प्रश्न सुटणार?

मिचाँग चक्रीवादळाने महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. हवामान खात्याने आज आणि उद्या विदर्भासह मराठवाड्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, गुरुवार आणि शुक्रवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील. गुरुवारी पूर्व विदर्भात, तर शुक्रवारी मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Rain Alert) होईल.

विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांसह पावसाचा 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

देशातील हवामानाबाबत बोलायचं झाल्यास, मिचाँग चक्रीवादळामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. स्कायमेट हवामान अहवालानुसार, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, दक्षिण बिहार आणि गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, पूर्व तेलंगणा, आंध्र प्रदेशचा उत्तर किनारा आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, मराठवाडा, पूर्व उत्तर प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

IMD Rain Alert in Next 48 hours marathwada vidarbha Maharashtra Many District Weather Update
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळणार? 'सुप्रीम' सुनावणी पूर्ण; कोर्टात नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com