Aditya Thackeray Latest News
Aditya Thackeray Latest NewsSaam Tv

Aditya Thackeray: दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होणार?

Aditya Thackeray News: दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
Published on

सूरज सावंत, मुंबई प्रतिनिधी | ०७ डिसेंबर, २०२३

Aditya Thackeray Latest News

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, दिशा सालियान मृत्यू प्रकरणात राज्य सरकारकडून आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी केली जाणार आहे, साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Aditya Thackeray Latest News
Maharashtra Winter Session 2023: हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने येणार; राज्याचे प्रश्न सुटणार?

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान हिचा ८ जून २०२० ला रोजी मृत्यू झाला होता. पोलिसांच्या (Police) माहितीनुसार दिशाने आत्महत्या केली होती. पण, तिची हत्या झाली असा संशय व्यक्त करत आरोप करण्यात आला होता.

दिशाच्या मृत्युनंतर जवळपास ६ दिवसांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत हा आपल्या घरात मृतावस्थेत आढळून आला होता.यामुळे दिशाच्या मृत्यू प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी देखील नितेश राणे यांनी केली. त्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात याप्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते.

दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदीत्य ठाकरे त्या वेळी होते कुठे ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. आता राज्य सरकार दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी करणार आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात हे SIT पथक काम करणार आहे. चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Aditya Thackeray Latest News
IMD Rain Alert: शेतकऱ्यांनो काळजी घ्या, ऐन थंडीत मुसळधार पाऊस कोसळणार; 'या' जिल्ह्यांना झोडपणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com