कलम 370 संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. पीओके बद्दल बोलताना ते म्हणाले आहेत की, पाकव्याप्त काश्मीरमधील 24 जागा राखीव ठेवणार.
ते म्हणाले की, मी पुन्हा सांगत आहे की, पाकव्याप्त काश्मीर भारताचाच आहे, ते आपलं आहे आणि ते आपल्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी कलम 370 वर निर्णय देताना म्हटले होते की, भारतात विलीन झाल्यानंतर जम्मू-काश्मीरला अंतर्गत सार्वभौमत्वाचा अधिकार नाही. ते असेही म्हणाले की, कलम 370 ही तात्पुरती तरतूद होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यावेळी अमित शाह यांनी काश्मीरच्या विलीनीकरणासाठी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना जबाबदार धरले. नेहरूंनी अर्धे काश्मीर सोडले होते, असेही ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले की, एक गोष्ट सर्वश्रुत आहे की, जर अकाली युद्धविराम झाला नसता तर आज पाकव्याप्त काश्मीर अस्तित्वात नसता. (Latest Marathi News)
दरम्यान, जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, 2023 आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, 2023 राज्यसभेत मंजूर करण्यात आले. ही दोन्ही विधेयके गेल्या आठवड्यात लोकसभेत मंजूर झाली.
जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, 2023 आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, 2023 वर राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, यापूर्वी जम्मूमध्ये 37 जागा होत्या. आता नवीन सीमांकन आयोगानंतर 43 जागा आहेत. पूर्वी काश्मीरमध्ये 46 जागा होत्या, आता 47 आहेत. यातच पाकव्याप्त काश्मीरमधील 24 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. कारण पीओके आपला आहे.
तत्पूर्वी अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आज कलम 370 वर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही आला आहे. असे असले तरी, काँग्रेस हे मान्य करत नाही आणि कलम 370 चुकीच्या पद्धतीने हटवण्यात आल्याचं सांगते. जे वास्तव काय आहे, ते मी त्यांना समजावून सांगू शकत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.