Shivraj Singh Chauhan: शिवराज सिंह चौहान यांचं आता काय होणार? मुख्यमंत्रिपद न मिळण्याची 'ही' आहेत कारणे

Madhya Pradesh CM: शिवराज सिंह चौहान यांचं आता काय होणार? मुख्यमंत्रिपद न मिळण्याची 'ही' आहेत कारणे
Shivraj Singh Chauhan
Shivraj Singh ChauhanSaam Tv

Shivraj Singh Chouhan News:

मध्य प्रदेशातील पुढील मुख्यमंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेला भाजपने सोमवारी पूर्णविराम दिला. शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेकांची नावे या पदाच्या शर्यतीत होती, मात्र पक्षाने सर्वांनाच चकित करत डॉ.मोहन यादव यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या शिवराज सिंह चौहान यांचा कार्यकाळही आता संपला आहे.

शिवराज यांच्या नेतृत्वाखाली राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला होता. विधानसभेच्या 230 जागा असलेल्या राज्यात पक्षाने 163 जागा जिंकल्या होत्या. लाडली बहनासारख्या शिवराजांच्या योजना हे त्याचे प्रमुख कारण मानले जात होते. त्यामुळे यावेळीही त्यांना मुख्यमंत्रीपद मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण सर्व अंदाज फोल ठरले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shivraj Singh Chauhan
Shivraj Singh Chouhan Resigned : मध्य प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग, शिवराज सिंह चौहान यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुख्यमंत्री न होण्याचे संकेत आधीच दिले होते संकेत

निवडणुकीनंतर आपण पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही, याचे त्यांनी आधीच दिले होते संकेत. याचमुळे त्यांनी कधीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सहभागी झाल्याचे जाहीर केले नाही किंवा तशी इच्छाही व्यक्त केली नाही. अशा प्रत्येक प्रश्नावर ते स्वत:ला मी भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता आहे, असं म्हणत आले आहेत.  (Latest Marathi News)

शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी मुख्यमंत्री होण्यात विशेष स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केले होते. निकालानंतर अनेक नेते दिल्ली दौऱ्यावर असताना शिवराज हे राज्यातील लोकसभेच्या जागांचा दौरा करत होते. राज्यातील सर्व 29 लोकसभेच्या जागा भाजपला जिंकून देण्याचे माझे ध्येय असल्याचे शिवराज यांनी अनेकदा सांगितले. पुढील वर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत, याचीच तयारी त्यांनी राज्यात आधीच सुरु केली आहे.

Shivraj Singh Chauhan
Madhya Pradesh CM: मध्य प्रदेशात भाजपचा महाराष्ट्र फॉर्म्युला, मोहन यादव MP चे नवीन CM; सोबत असणार 2 उपमुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकीत मिळणार मोठी जबाबदारी?

मध्य प्रदेशात शिवराज सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जो विजय मिळवला आहे, त्यामुळे भाजपला आता पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही आपली विजयी घोडदौड सुरु ठेवायची आहे. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवूनही ते ज्या प्रकारे राज्यातील लोकसभेच्या जागांवर दौरे करत आहेत, त्यावरून लोकसभा निवडणुकीच्या तयारीत पक्ष त्यांना महत्त्वाची जबाबदारी देऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. यातच भाजपला आगामी लोकसभेत पुन्हा यश मिळण्यास, त्यांना केंद्रातील सरकारमध्ये मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com