Jalana Breaking News: मोठी बातमी! अर्जुन खोतकरांच्या कार्यकर्त्यावर भरदिवसा गोळीबार; जालना हादरलं!

Jalana News: जालना शहरातील मंठा चौफुली भागात असलेल्या होंडा शोरुमसमोर गोळीबाराचा थरार रंगला. शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांचा समर्थक असलेला गजानन तौरवर तिघांनी गोळीबार केला.
Jalana Breaking News
Jalana Breaking NewsSaamtv
Published On

Jalana Breaking News:

जालना शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील मंठा चौफुली भागातील होंडा शोरूमसमोर गोळीबाराची घटना घडली आहे. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचे कार्यकर्ते गजानन तौर यांच्यावर तिघांनी गोळीबार केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवार (११ डिसेंबर) जालना (Jalana) शहरातील मंठा चौफुली भागात असलेल्या होंडा शोरुमसमोर गोळीबाराचा थरार रंगला. शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांचा समर्थक असलेला गजानन तौरवर तिघांनी गोळीबार केला. गजानन तौर हा रामनगर कारखान्याकडून जालनाकडे त्यांच्या चारचाकी वाहनाने येत होता.

यावेळी पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी तौर यांच्यावर गावठी पिस्तूलातून गोळीबार केला. गजानन तौर यांच्यावर चार गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. चार गोल्यापैकी दोन गोळ्या तौर यांना लागल्या आहेत, तर दोन गोळया चाटून गेल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalana Breaking News
Maharashtra Politics: 'मविआ'च्या जागावाटपावर शरद पवार यांचे मोठे विधान; ठाकरे गटाचा तो दावाही खोडला

गोळीबारानंतर स्थानिकांनी तात्काळ गजाननला उपचारासाठी जालन्याच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गोळीबार झालेला गजानन तौर हा शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. या भयंकर घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Jalana Breaking News
Sharmila Raj Thackeray: 'माझ्याही मुलीला नको ते मेसेज येतात'; डीपफेक, कमेंट्सवरून शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केली चिंता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com