Gangappa Pujari
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोविंदराव पवार यांचा आज वाढदिवस. शरद पवार आज ८३ वर्षाचे झालेत. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षणक्षेत्र, कृषी, क्रिडा अशा प्रत्येक क्षेत्रात शरद पवार यांनी आपला दबदबा निर्माण केलायं. काटेवाडी ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.
12 डिसेंबर 1940 साली बारामतीमधील काटेवाडीमध्ये शरद पवार यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार आहे.
आपल्या वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1967 साली शरद पवार हे पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.
मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधून शरद पवार ४० समर्थकांसह बाहेर पडले. जुलै 1978 मध्ये 'पुरोगामी लोकशाही दलाचे' नेते म्हणून शरद पवार हे ३८ व्या वर्षी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले.
कॉंग्रेसमध्ये असताना सोनिया गांधी यांनी पंतप्रधान व्हावे, या मताचा मोठा वर्ग होता. मात्र १९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत पी ए संगमा, तारिक अन्वर यांच्या सोबतीने 'राष्ट्रवादी कॉंग्रेस' पक्षाची स्थापना केली.
२०१९ च्या निवडणूकीपुर्वी भाजपकडून शरद पवारांविरोधातही ईडी, सीबीआय पाठवून नामोहरम करण्याची चाल खेळली गेली. मात्र शरद पवारांनी मीस्वतःच ED कडं जातो म्हणून डाव उलटवून लावला.
2019 च्या निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही. भाजप आणि शिवसेनेतही सर्व काही आलबेलं नव्हतं. शरद पवारांनी हीच संधी साधून शिवसेनेला आणि काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली.
2019 च्या विधानसभा निवडणुकीतली पवारांची साताऱ्यातली भर पावसातली सभा प्रचंड गाजली. राष्ट्रवादीला संजीवनी देणारी ही सभा ठरली. या सभेतून छत्रपती उदयनराजे यांचा पराभव करण्याचा पराक्रम शरद पवारांनी केला...
शरद पवार 29 नोव्हेंबर 2005 मध्ये भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले आणि 2008 पर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. त्यानंतर 1 जुलै 2010 रोजी ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचेही (ICC) अध्यक्ष बनले आणि 2012 पर्यंत ते यापदावर होते.
शरद पवार यांनी आतापर्यंत चार वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय त्यांनी देशाचे संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून काम पाहिले. शरद पवार हे अनेक वर्षांपासून खासदार आणि विधानसभेचे सदस्य आहेत.
पद्मविभूषण...
शरद पवार यांना त्यांच्या प्रदीर्घ आणि गौरवशाली राजकीय कारकिर्दीत 2017 मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे.