Gangappa Pujari
केंद्रातील तसेच राजकीय राजकारणातील महत्वाच्या नेत्या म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले जाते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस. सुप्रिया सुळे यांनी 55 व्या वर्षात पदार्पण केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील जय हिंद महाविद्यालायतून सुक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) या विषयात पदवी घेतली. त्यानंतर सदानंद भालचंद्र सुळे यांच्याशी लग्न केल्यावर त्या कॅलिफॉर्नियात गेल्या. तिथे त्यांनी जल प्रदूषण या विषयाचे शिक्षण घेतले.
शरद पवार यांनी एका मुलाखतीत बोलताना "सुप्रिया कधी राजकारणात येईल असं मला वाटलं नाही ही गोष्ट खरी आहे. ला वाटलं की ती राजकारणात येणार नाही, पण वडिलांचा अंदाज चुकीचा कसा आहे, हे मुलगी ठरवू शकते, त्याचं हे उदाहरण..." असे सांगितले होते.
2006 मध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांनी बाळासाहेबांची भेट घेतली आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या केंद्रात उमेदवारीसाठी सु्प्रिया सुळे हे नाव पुढे आले. यावेळी त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाली.
अधिकाधिक महिलांना राजकारण आणि समाजकारणात आणण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली 2012 मध्ये 'राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस'ची स्थापना झाली.
सुप्रिया सुळे 2009 ला तर निवडून आल्याच पण 2014 आणि 2019 मध्ये 'मोदी'लाट असतांनाही त्या सलग तिस-यांदा खासदार झाल्या.
सुप्रिया यांची लोकसभेतली कामगिरी अभ्यासकांच्या नजरेतूनही कौतुकाची राहिली आहे. त्यांची अधिवेशनातली उपस्थिती, विचारलेल्या प्रश्नांची संख्या, भाग घेतलेल्या चर्चांची संख्या ही कायम इतरांपेक्षा अधिक राहिली आहे.. गेल्या सात वर्षांपासून त्या उत्कृष्ठ संसदपटूचा पुरस्कार पटकावत आहेत.
सुप्रिया सुळे यांच्या व्यक्तित्वातील महत्वाचा भाग म्हणजे त्यांचं साधं राहणीमान. म्हणूनच जनसामान्यांच्या मनात घर करणाऱ्या लोकप्रिय महिला नेत्या अशी त्यांची खास ओळख आहे.
आपल्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छुकांनी फुलं, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तकं, शालेय वस्तू, रेनकोट, भेटवस्तू या गोष्टींचं वाटप करावं. असे आवाहन केले आहे.