Accident News : आधी पलटी झाली, नंतर पेट घेतला; बीडमध्ये प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; २५ प्रवासी गंभीर जखमी

Beed Accident News : बीड जिल्ह्यातील केजजवळ जळगाव-लातूर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. बस पलटी झाल्यानंतर आग लागून २५ प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Beed Kej Private Bus Accident
Beed Kej Private Bus AccidentSaam Tv
Published On
Summary
  • बीड जिल्ह्यातील केजजवळ ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

  • बस पलटी झाल्यानंतर अचानक आग लागली

  • या दुर्घटनेत २५ प्रवासी गंभीर जखमी

  • जखमींवर केज उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

Beed Kej Private Bus Accident बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे. जळगाववरून लातूरकडे जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर या बसने पेट घेतला आणि सगळीकडे आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत प्रवाशांच्या सामानाचे नुकसान झाले असून २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एक खाजगी ट्रॅव्हल्स जळगाववरून लातूरकडे जात होती. ही ट्रॅव्हल्स केज मांजरसुंबा रोडवर पहाटे २.४५ वाजता केजपासून जवळ सांगवी ते पिंपळगाव फाट्यावर पलटी झाली. त्यानंतर बसने अचानक पेट घेतला. काही वेळातच आगीचे लोळ सर्वत्र पसरले.

Beed Kej Private Bus Accident
Vada Pav : 'वडापाव'प्रेमींसाठी धक्कादायक बातमी, कर्जतचा चविष्ट वडापाव बंद, कारण आले समोर

चालकाच्या अतिवेगामुळे हा अपघात घडल्याचं म्हटलं जात आहे. या दुर्घटनेत २५ प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अपघातस्थळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार आणि सहाय्यक पोलिस उपनिरक्षक शंभुदेव दराडे दाखल झाले.

Beed Kej Private Bus Accident
Mumbai : 'बुलाती है मगर जाने का नहीं' पुरुषांना जाळ्यात ओढायच्या, कॅफेत नेऊन भलतंच करायच्या, मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर

अपघातग्रस्त प्रवाशांना ट्रॅव्हल्स मधून बाहेर काढले असून पोलिस प्रशासन व रुग्णवाहिका यांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या अपघातात प्रवाशांचे सामान जळून खाक झाले. काहींची महत्त्वाची कागदपत्र देखील गहाळ झाली. या दुर्घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्मण झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com