Vada Pav : 'वडापाव'प्रेमींसाठी धक्कादायक बातमी, कर्जतचा चविष्ट वडापाव बंद, कारण आले समोर

Karjat Vada Pav : गॅस टंचाईमुळे कर्जतचा प्रसिद्ध वडापाव बंद करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय युद्धामुळे व्यावसायिक गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल व्यवसायिकांना हा निर्णय घ्यावा लागला असून पर्यटक आणि खवय्यांमध्ये निराशा पसरली आहे.
Vada Pav : वडापावप्रेमींसाठी धक्कादायक बातमी, कर्जतचा चविष्ट वडापाव बंद, कारण आले समोर
Karjat Famous Vada Pav Stalls ClosedSaam Tv
Published On
Summary
  • गॅस टंचाईमुळे कर्जतचा प्रसिद्ध वडापाव बंद

  • आंतरराष्ट्रीय युद्धामुळे व्यावसायिक गॅस पुरवठा विस्कळीत

  • पर्यटक आणि खवय्यांमध्ये मोठी निराशा

  • महाराष्ट्रातील हॉटेल व्यवसायावर गॅस टंचाईचा परिणाम

विकास मिरगणे, कर्जत

Karjat Famous Vada Pav Stalls Closed वडापाव प्रेमींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कर्जतचा प्रसिद्ध असलेला वडापाव अखेर कर्जतकरांसाठी तसेच पर्यटकांसाठी आता बंद झालेला आहे. गॅस पुरवठा होत नसल्यामुळे अखेर हॉटेल व्यवसायिकांनी हा निर्णय घेतला आहे. जगात सुरु असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठा होत नसून त्याची झळ आता खवय्यांना बसली आहे.

कर्जतचा प्रसिद्ध वडापाव चविष्ट असल्याने अनेक पर्यटक शनिवार रविवार खास वडापाव खाण्यासाठी मोठ्या संख्येने कर्जतमध्ये येत असतात. तसेच कर्जत तालुक्यात चार ते पाच हजार फार्महाउस असल्याने, पर्यटक कर्जतमध्ये येत असतात. त्यामुळे पर्यटक येता जाताना कर्जतच्या वडापाववर ताव मारत असतात. मात्र आता हा वडापाव गॅस पुरवठा बंद असल्याने कर्जतकरांसाठी आणि पर्यटकांसाठी बंद करण्याची वेळ हॉटेल व्यवसायकांवर आली आहे.

Vada Pav : वडापावप्रेमींसाठी धक्कादायक बातमी, कर्जतचा चविष्ट वडापाव बंद, कारण आले समोर
Rain Alert : महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार, ९ जिल्ह्यांना अलर्ट, वाचा पाऊस कुठे धो धो कोसळणार?

पुण्यातील हॉटेल मेनूमध्ये बदल

सध्या सुरू असलेल्या अमेरिका इस्राएल आणि इराण मधील युद्धामुळे भारतात व्यावसायिक सिलेंडर चा मोठा तुटवडा आहे. या युद्धाची सर्वाधिक झळ हॉटेल व्यावसायिकांना बसल्याचे पहायला मिळत आहे. पुण्यातील अनेक हॉटेल, उपाहारगृह यांनी त्यांच्या मेनू मधील अनेक पदार्थ कमी केले तर काही ठिकाणी पुणेरी शब्दात नागरिकांच्या सवयीचे पदार्थ सुद्धा मिळणार नाहीत असं सांगितलं जात आहे. गॅस नसल्यामुळे एका उपारगृहात कडक पाव, कडक भाकरी आणि थालीपीठ मिळणार नाही असा बोर्ड लावल्याने खवय्यांची हिरमोड पाहायला मिळते.

Vada Pav : वडापावप्रेमींसाठी धक्कादायक बातमी, कर्जतचा चविष्ट वडापाव बंद, कारण आले समोर
Mumbai : 'बुलाती है मगर जाने का नहीं' पुरुषांना जाळ्यात ओढायच्या, कॅफेत नेऊन भलतंच करायच्या, मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर

भंडाऱ्यात गॅस एजन्सीसमोर रांगा

आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाला असून, महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात त्याचे विदारक पडसाद उमटत आहेत. भंडाऱ्यात सध्या गॅस एजन्सीसमोर पहाटेपासूनच लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. तासनतास ताटकळत राहूनही गॅस मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये मोठा संताप आहे. काही ठिकाणी गॅससाठी अवाच्या सव्वा किंमत मोजावी लागत असल्याची तक्रारही नागरिक करत आहेत. गॅस मिळत नसल्याने ग्रामीण भागातील चित्र बदलले आहे. कित्येक वर्षांपासून बंद असलेल्या चुली पुन्हा पेटल्या आहेत. मात्र, या चुली पेटवण्यासाठी आता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे. ग्रामीण भागातील महिला डोक्यावर लाकडाच्या मोळ्या वाहून नेताना दिसत आहेत. एकीकडे आपण प्रदूषणमुक्तीच्या गप्पा मारतोय, तर दुसरीकडे इंधनाच्या टंचाईमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसतोय. युद्ध परदेशात सुरू आहे, पण त्याचे चटके भंडाऱ्यातील सामान्य जनतेला बसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com