कोमल दामुद्रे
मुंबईच्या उपनगरातील वसई येथे असलेला लोकप्रिय धबधबा अनेकांच्या डोळ्याचे पारणे फेडतो.
नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेला चिंचोटी धबधबा लोकांचे आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.
वसईत असलेला चिंचोटी हा पश्चिम घाटाच्या हिरवाईने वसलेला एक नयनरम्य धबधबा आहे.
चिंचोटी धबधबा नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील विलोभनीय दृश्य पाहण्यासारखे आहे.
जंगलाच्या वाटेने सोपा ट्रेक करून तुम्ही चिंचोटी धबधब्यापर्यंत पोहोचू शकता. चिंचोटीला जाताना अनेक छोटे धबधबे दिसतात.
चिंचोटी धबधबा निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी एक लोकप्रिय ठिकाणं आहे.
चिंचोटी विशेषत: पावसाळ्यात जेव्हा पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे धबधबा पूर्ण वैभवात असतो
चिंचोटी धबधब्याच्या आजूबाजूचा परिसर हा एक छान पिकनिक स्पॉट आहे. पर्यटक अनेकदा स्नॅक्स पॅक करतात आणि विश्रांतीचा आनंद घेतात.