Monsoon Honeymoon Travel Place : पावसाळ्यात कपलसाठी बेस्ट आहेत महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणे !

कोमल दामुद्रे

पावसाळा

पावसाळा हा ऋतू खरेतर प्रेमाचा. या ऋतूमध्ये अनेकांना फिरण्याची आवड असते.

वातावरण

या ऋतूमध्ये अनेकांना निसर्गरम्य दृश्याचा आनंद घ्यायचा असतो. या वातावरणात हिरवाईने नटलेली वनराई पाहण्यासाठी अनेक जण आतूरतेने वाट पाहात असतात.

महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या सौंदर्यबद्दल सांगायचे झाले तर, महाराष्ट्र हे राज्य डोंगरदऱ्यांनी, धबधब्याचे, हिरव्यागार गवताने बहरलेलं आहे.

हनीमून

जर तुमचेही नुकतेच लग्न झालेले असेल आणि हनीमूनसाठी ठिकाण शोधत असाल तर महाराष्ट्रातील या ठिकाणांना भेट देऊ शकता.

लोणावळा

लोणावळा हे पर्यटन स्थळ मुंबईच्याजवळ आहे. हे अतिशय निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. लोणावळ्यामध्ये डोंगर, दऱ्या, धबधबे, आणि महत्त्वाचं म्हणजे लोणावळा चिक्की ही अतिशय लोकप्रिय आहे.

कोलाड

कोलाड हे पर्यटन स्थळ व्हाईट रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. पर्यटनस्थळ कपल्ससाठी अतिशय मजेशीर आहे. पावसाळ्यात याचे दृश्य अधिक मनमोहक ठरते.

अलिबाग

अलिबाग हे पर्यटन स्थळ त्याच्या मोठ्या समुद्रांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर इथे सुंदर दृश्य, वीला यांसारख्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पार्टनरला घेऊन अलिबाग येथे येऊ शकता.

रत्नागिरी

रत्नागिरी हे शहर त्यांच्या मोठमोठ्या डोंगरांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर येथे जंगल, धबधबे , डोंगरे आहेत. तुम्ही हनीमूनसाठी बेस्ट डेस्टिनेशन म्हणून रत्नागिरी हे शहर निवडू शकता.

औरंगाबाद

औरंगाबाद हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक केंद्रासाठी ओळखले जाते. तुम्ही तुमचा ओकेशन प्लान करण्यासाठी औरंगाबाद हे शहर निवडू शकता.

Next : अधिकमासात या राशींच्या प्रेमात येणार अडथळे, भाग्यात होतील मोठे बदल

येथे क्लिक करा