कोमल दामुद्रे
महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणं आहेत जी पर्यटकांना भूरळ पाडतात.
संत्र्यांचं शहर म्हणून ओळखले जाणारे नागपूर मुंबई-पुण्यानंतर राज्यातील तिसरे शहर म्हणून ओळखले जाते.
तुम्ही देखील फिरण्याचा प्लान करत असाल तर फॅमिलीसोबत नागपूरमधील या ठिकाणांना भेट द्या
फुटाळा तलाव हा नागपूरच्या पश्चिम भागात असणारा तलाव आहे. याला तेलंगखेडी तलाव म्हणूनही ओळखले जाते.
नागपूरच्या सिव्हील लाईन भागात जपानी रोझ गार्डन आहे. येथील लॉन, रंगीबेरंगी फुले आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते.
आशियातील सर्वात मोठा स्तूप असलेल्या या ऐतिहासिक वास्तूला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला कुटुंबासोबत फिरता येते.
नागपूरचा आणखी एक सुंदर तलाव, अंबाझरी तलाव वन डे ट्रिपसाठी, पक्षी निरीक्षणासाठी, फॅमिलीसोबत किंवा पार्टनरसोबत सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकतो.
नागपूरपासून थोड्या अंतरावर, रामटेक मंदिर डोंगरावर वसलेले आहे आणि आसपासच्या ग्रामीण भागाचे विहंगम दृश्य येथे पाहायला मिळते.
हे मंदिर परिसर त्याच्या सुंदर वास्तुकला आणि प्रसन्न वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. येथे आपण कुटुंबासोबत जाऊ शकतो.
नागपूरच्या भूतकाळाची झलक देणारा ऐतिहासिक सीताबुलडी किल्ला. पर्यटकप्रेमींसाठी हा किल्ला अतिशय शांत वातावरणासाठी ओळखला जातो.
नागपूर शहरातील शून्य मैलाचा दगड ब्रिटशांनी उभारला असून येथून देशातील सर्व अंतरे मोजली जातात. फिरण्यासाठी हे ठिकाण सुंदर आहे.