अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल १९ नोव्हेंबरला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा ६ विकेट्सने पराभव केला आहे. या पराभवामुळे भारताचं आयसीसी वर्ल्डकप स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न भंगल आहे.
टीम इंडियाचा पराभव झाल्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हा सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी अहमदाबादमध्ये हजेरी लावली होती. अनेकजणांनी घरुन या सामन्याचा आनंद लुटला. सध्या अनेक सेलिब्रिटींच्या सोशल मीडियावर पोस्ट चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. (Marathi Film)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह मराठी सेलिब्रिटींनीही पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरने रडण्याचे एक स्टीकर शेअर केले आहे.
तर अमेय वाघने ‘सोडा यार... माझी ‘काळा पाणी’ वेबसीरीज बघ त्यामध्ये कोणीच हरत नाही. #survivaldrama’ असं कॅप्शन देत एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली.
अभिनेता गश्मीर महाजनीने सुद्धा एक स्टोरी शेअर केली आहे. ‘बच्चन साहेबांनी लपून मॅच पाहिली,’ आणि पुढे दोन हसण्याचे इमोजी शेअर केले. अशी गमतीशीर पोस्ट गश्मीर महाजनीने शेअर केली.
तर ‘बिग बॉस मराठी २’ फेम अभिजित केळकरने ‘माझं डोकंच आता डोक्यामध्ये जातंय...’ असं म्हणत त्याने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली.
त्यासोबतच प्रिया बापटनेही इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये तिने एक व्यक्ती रडतानाचा स्टीकर शेअर केला आहे.
‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने “चला…टीव्ही बंद करतेय”, असं म्हणत स्टोरी शेअर केली.
अभिनेता जितेंद्र जोशीने एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे, पोस्टमध्ये अभिनेता म्हणतो, “असे अनेक लोकं असतील जे आमच्या संघावर दादागिरी करतील किंवा आमच्याच खेळाडूंना बकवास बोलतील. अनेक नेटिझन्सने प्रत्येक खेळाडूवर टीका केली, त्यांच्यावर बालिश मीम्स बनवली आहे. पण टीम इंडियाने संपूर्ण टूर्नामेंटमध्ये खूप छान कामगिरी करुन दाखवली आहे. त्यांनी केलेल्या कामगिरीचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. कारण त्याच संघाने भारताला एकही सामना न हरवता फायनल पर्यंत पोहोचवलं. आपण सर्व भारतीय एक प्रेक्षक आणि एक कुटुंब म्हणून एकत्रित खेळल्याचा मल आनंद आहे.
शेवटी हा एक खेळ आहे!! कुणालातरी जिंकण्यासाठी कुणालातरी हरावं लागतं. तो आपला दिवस नसला तरी टीम इंडिया खूप चांगल्या पद्धतीने खेळली. मी सध्या दु:खी आहे पण त्या खेळाडूंच्या दु:खापुढे काही नाही. त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले, आपल्या सर्वांच्या वतीने ते मैदानामध्ये खेळले. या वर्ल्डकपमध्ये, जरी आपण सर्वोत्तम ठरलो नसलो तरीही भारत हरलेला नाही. माझा टीम इंडियाला पाठिंबा आहे, मी नेहमीच त्यांच्यासोबत आहे. टीम ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन, तुम्ही आमच्यापेक्षा खूप चांगले खेळलात... असं जितेंद्र जोशीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.