Gashmeer Mahajani on Ravindra Mahajani News: मराठी सिनेृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे १५ जुलै रोजी निधन झाले आहे. पुण्यातील तळेगाव दाभाडेतील राहत्या घरी ते मृतावस्थेत आढळले होते.
सोशल मीडियावर त्यांच्या निधनानंतर चाहते अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. नुकताच सोशल मीडियावर गश्मीरने चाहत्यांसोबत ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनच्या माध्यमातून संवाद साधला आहे. यावेळी अभिनेत्याने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरं दिली आहेत.
रविंद्र यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी त्यांच्यासोबत का राहत नव्हता?, ते आपल्या परिवारासोबत का राहत नव्हते?, गश्मीरचा वडिलांसोबत संपर्क होत नव्हता का? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थिक केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गश्मीरने सोशल मीडियावर वेळ आली की नक्कीच प्रतिक्रिया देईल, अशी माहिती गश्मीरने सांगितली होती.
‘आस्क मी एनिथिंग’ मध्ये चाहत्यांनी गश्मीरला अनेक प्रश्न विचारले आहेत. अभिनेत्याला चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न पुढीलप्रमाणे, ‘तू सध्या कसा आहेस?’, यावर गश्मिर म्हणतो, ‘आई सध्या या गोष्टीतून सावरण्याचा प्रयत्न करते, आम्ही सर्वच या प्रकरणातून बाहेर येत आहोत.’ तर आणखी एक युजर म्हणतो, ‘तू शूटिंगला सुरूवात केली का?’, यावर गश्मिर म्हणतो, ‘नाही, आईला बरं वाटायला लागलं की, मी शूटिंगला करेल सुरूवात’
तर आणखी एकाने त्याला प्रश्न विचारला की, ‘तुला या कठीण दिवसात मराठी सेलिब्रिटींनी सपोर्ट केलं का?’,तर या प्रश्नावर गश्मिर म्हणतो, ‘हो, मला माझ्या वाईट आणि कठीण काळात इंडस्ट्रीतील काही मोजक्या समजुतदार लोकांनी साथ दिली. त्यामध्ये दिग्दर्शक प्रवीण तरडे, रितेश देशमुख आणि मृण्मयी देशपांडे याांनी मला मदत केली. ही फार चांगली माणसं असून त्यांना विसरणं शक्य नाही.’अशा अनेक युजर्सने गश्मिरला प्रश्न विचारले आहेत. तर आणखी एका युजरने गश्मीरला प्रश्न विचारला की, ‘वडीलांसाठी काही शब्द’, यावर गश्मीर म्हणतो,‘मी ते शब्द वडीलांच्या तेराव्यात बोललो आहे. त्याविषयी तुम्हाला सांगून काही अर्थ नाही.’
गश्मीरने वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यावेळी गश्मिर म्हणाला होता की, “ताऱ्याला ताऱ्यासारखंच राहू द्या. मी आणि माझे कुटुंबीय शांतच राहणं पसंत करतोय. माझ्या न बोलण्याने जर मला मानहानी पत्करावी लागत असेल तर, इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणे याचा मी स्वीकार करतो. आपल्यातून निघून गेलेल्या त्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती. ते माझे वडील होते. माझ्या आईचे पती होते. तुमच्या सर्वांपेक्षा आम्ही त्यांना जास्त चांगलं ओळखतो. कदाचित योग्य वेळ आली की मी भविष्यात याविषयी बोलेन.”
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.