भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप फायनल मॅचची क्षणाक्षणाला उत्सुकता वाढत चालली आहे. हा क्रिकेट सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आजचा क्रिकेट सामना खेळत आहे. टीम इंडियाला चिअर्स करण्यासाठी अहमदाबादमध्ये (Ahemadabad) लाखो चाहत्यांसोबत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ही हजेरी लावल्याचे दिसत आहे. अशातच मराठी भाषेत खालील पाठांचे परावर्तन करा: प्रविष्टि: बॉलिवूडच्यासेलिब्रिटींनी देखील आपल्या उपस्थितीनं प्रेक्षकांचे लक्ष वेधले. (Bollywood)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या सेमी फायनलमध्येही अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सेमी फायनलमध्ये टिम इंडियाला चिअर्स केल्यानंतर आता फायनलसाठीही अनेक मराठीसह बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. यावेळी मराठी अभिनेत्रींमध्ये मृण्मयी देशपांडे आणि मिथिला पालकरने हजेरी लावली होती. (Bollywood Actor)
तर बॉलिवूडमध्ये शाहरुख खान, आर्यन खान, सुहाना खान, अब्राहम, विवेक ऑबेरॉय, डग्गुबाटी व्यंकटेश, उर्वशी रौतेला, आथिया शेट्टी, अनुष्का शर्मा, सारा तेंडुलकर, दीपिका पादुकोण, दीपिकाचे वडील, रणवीर सिंग, आयुष्मान खुराणा, शाहिद कपूर, कतरिना कैफ, सलमान खान, आशा भोसले, रणबीर कपूर सह अनेक सेलिब्रिटींनी फायनलला प्रमुख उपस्थिती लावली आहे. या सर्व सेलिब्रिटींच्या उपस्थितीने चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. (Bollywood Actress)
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिमयवरील किंग खानच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. यावेळी त्याने व्हाईट रंगाचा टी-शर्ट आणि ब्लू रंगाचं जॅकेट परिधान केले आहे. यावेळी त्याने येताच आपल्या सेलिब्रिटी मित्रांचीही भेट घेतली. या वर्षामध्ये किंग खानच्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता. (Entertainment News)
‘पठान’, ‘जवान’नंतर शाहरुखचा ‘डंकी’ येत्या डिसेंबर महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये मुख्य भुमिकेत शाहरुख खान, तापसी पन्नू, दिया मिर्झा, बोमन इराणी, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष अशी दमदार कलाकारांची स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. तर चित्रपटामध्ये विकी कौशल कॅमिओ करणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपट येत्या २१ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Bollywood Film)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.