आजपासून अर्थात २० नोव्हेंबरपासून ५४ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (54th International Film Festival Of India) या पुरस्कार सोहळ्याला सुरुवात होणार आहे. ह्या पुरस्कार सोहळ्याला गोव्याची राजधानी पणजीतल्या श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते या इफ्फी पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यावेळी पुरस्कार सोहळ्यामध्ये, १३ वर्ल्ड प्रीमियर्स, १८ इंटरनॅशनल प्रीमियर्स, ६२ आशिया प्रीमियर्स, ८९ इंडिया प्रीमियर्ससाठी दर्जेदार चित्रपटांची निवड करण्यात आली असल्याची माहिती एनएफडीसीचे व्यावस्थापकीय संचालक प्रिथूल कुमार यांनी दिली. (Awards)
या फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनाला शाहिद कपूर, माधूरी दीक्षित, श्रिया सरन, नुशरत भरुचा, श्रेया घोषाल, सुखविंदर सिंग सारखे दिग्गज सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत. सारा अली खान आणि दिग्दर्शक करण जोहर एकत्र संवाद सत्र आयोजित करणार आहेत. (Bollywood)
५४ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा ज्युरी प्रमुख म्हणून ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची निवड झाली आहे. त्यांच्यासोबत इतर पाच जणांचाही समावेश होणार आहे. पाच सदस्यीय ज्युरी पॅनलमध्ये निर्माते शेखर कपूरसह स्पॅनिश सिनेमॅटोग्राफर जोस लुइस अल्केन, निर्माते जेरोम पेलार्ड, कॅथरीन दुसार्ट आणि हेलन लीक यांचा समावेश आहे. 'आंतरराष्ट्रीय विभागात' १८२ चित्रपट असून 'इंडियन पॅनोरमा' विभागात भारतातील २५ फीचर फिल्म आणि २० नॉन-फीचर फिल्म्स दाखवले जाणार आहेत. (Entertainment News)
कार्तिक आर्यन व्यतिरिक्त, वरुण धवन, क्रिती सेनॉन, सारा अली खान, मृणाल ठाकूर, अमृता खानविलकर, शाहिद कपूरसह अवघी बॉलिवूड आणि हॉलिवूड इंडस्ट्री फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अवतरणार आहे. हा सोहळा ९ दिवसांचा असून २८ नोव्हेंबरला समारोप समारंभात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा डान्स परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. (Latest News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.