वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये सुरू आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. कोट्यवधी भारतीय टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. यापूर्वी अभिनेता सलमान खानने शुक्रवारी टायगर 3 रिलीजच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये अहमदाबादमध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या संघाच्या नावाची भविष्यवाणी केली होती.
अलिकडेच सलमान खानने त्याच्या बहुचर्चीत टायगर ३ च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये त्याच्या सहकलांकारासोबत उपस्थित होता. यात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीही होता. यादरम्यान सलमानला विश्वचषक २०२३ साठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यातील विजेत्याबद्दल विचारण्यात आले. आपल्या टिम इंडियावर असलेल्या विश्वावर सलमान म्हणाला की, भारताने आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. तसंच आमच्या या टायगर ३ च्या चित्रपटाने चांगले कलेक्शनही केले. आता भारत विश्वचषक नक्कीच जिंकेल आणि प्रेक्षक पुन्हा आमचा चित्रपट बघण्यासाठी हजेरी लावतील.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
याशिवाय कतरिना कैफने शनिवारी तिच्या इंस्टाग्रामवर 'आस्क मी एनीथिंग' या कॅप्शने लाईव्ह आली होती. यादरम्यान तिच्या चाहत्यांनी तिला रविवारी अहमदाबाद येथे होणाऱ्या हाय-व्होल्टेज स्पर्धेच्या विजेत्यासह विविध विषयांवर अनेक प्रश्न विचारले. तेव्हा उत्तरात कतरिनाने भारताचा ध्वज दाखवत 'हा प्रश्न आहे का?' असे उत्तर दिले.

हा खेळ पाहण्यासाठी स्टेडियममध्ये 1 लाखांहून अधिक चाहते उपस्थित आहेत आणि कोट्यवधी लोक त्यांच्या घरी बसून थेट पाहत आहेत. दरम्यान खेळ अधिक रोमांचक करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.