Priya Bapat Struggle News: बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहिलेल्या अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या स्ट्रगलबद्दल मोठं विधान केले आहे. या विधामुळे ती सध्या चर्चेत आली आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसीरिजमुळे प्रिया बापट प्रकाशझोतात आली. प्रियाने नुकताच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये 'मराठी सोडून इतर इंडस्ट्रीत स्वत:ला जर सिद्ध करायचे असेल, तर संघर्ष करावा लागतो.' अशी माहिती दिली. नुकताच प्रिया ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ सीझन ३ च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
अभिनेत्री प्रिया बापटची (Priya Bapat) बहुचर्चित वेबसीरिज ‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’ (City Of Dreams 3) नुकताच प्रदर्शित झाली. पहिल्या सीझनपासून चर्चेत राहिलेल्या या वेबसीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’ नंतर प्रिया बापट ‘रफूचक्कर’ (Rafuchakkar) या हिंदी वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच प्रिया बापटने मराठी सिनेसृष्टी सोडून इतर सिनेसृष्टीतील संघर्षावर भाष्य केलं आहे.
एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत प्रिया बापटने सांगितले की, ‘मला बऱ्याचदा मराठी सिनेसृष्टी सोडून इतर सिनेसृष्टीत भेदभावाचा सामना करावा लागतो. यासोबतच मला आजही माझ्या भूमिकेसाठी आणि माझ्या अभिनयासाठी देखील संघर्ष करावा लागतो. एक मराठी अभिनेत्री म्हणून देखील मला भेदभाव आणि संघर्षाचा सामना करावा लागतो. मला याबद्दल अद्याप कोणीही बोलले नाही. पण मला करावा लागत असलेल्या संघर्षातून याची नेहमी जाणीव होते. मी नेहमीच मला मिळत असलेल्या भूमिकेतूनच स्वत:ला सिद्ध करते.’
आपल्या मुलाखतीत प्रियाने पुढे सांगितले की, ‘मला मराठी चित्रपटांमध्ये काम करताना एक वेगळाच आनंद मिळतो. मला मराठी चित्रपटांत जेव्हा कास्ट केले जाते त्यावेळी कोणत्याच संघर्षाचा सामना करावा लागत नाही. पण ज्यावेळी मला अन्य सिनेसृष्टीत चित्रपटबद्दल कास्ट केलं जातं त्यावेळी एक वेगळाच संघर्ष मला करावा लागतो. माझ्यातील दुर्गुण पाहण्यापेक्षा त्यांनी माझा अभिनय, माझं काम पाहावं.’ असं तिने यावेळी स्पष्टपणे सांगितले.
सोबतच मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात प्रियाने बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार संजय दत्त यांच्यासोबतच्या कामाचा अनुभव सांगितला. प्रिया म्हणाली की, ‘मी आणि संजय दत्त यांनी ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. मला शूटिंग दरम्यान त्यांची खूपच भिती वाटायची. मी शूटिंगदरम्यान एका वेटिंग रूममध्ये थांबले होते. त्यावेळी त्यांनी माझ्यासमोर डबिंगचे काम केलं होतं. ते त्यांनी खूप चांगल्या रित्या केले होते.’
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.