सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना शस्त्रे पुरवणारा अनुज थापरने मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील लॉकअपमध्ये बुधवारी (१ मे) आत्महत्या केली आहे. आरोपी अनुज थापर मुळचा पंजाबचा आहे. त्याने बुधवारी शौचालयातील खिडकीला चादरीच्या पट्टीच्या सहाय्याने गळफास घेतला. नुकताच त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलेला आहे. अनुजने तुरूंगामध्ये गळफास लावून घेतल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.
(Anuj Thapar Family Seek CBI Probe Refuse To Take Body After Post Mortem Report)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या मानेवर जखमेच्या खुणा आणि गुदमरल्याच्या खुणा होत्या. पण नंतर अनुज थापरच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलेला आहे. 'पोलीस कोठडीत छळ करून अनुजची हत्या करण्यात आली' असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. यानंतर अनुजच्या कुटुंबीयांनी ह्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे. अनुज थापन आणि त्याचा सहकारी सोनू बिश्नोईला २६ एप्रिल रोजी पंजाबमधून अटक करण्यात आली होती. त्या दोघांवरही सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप होता. (Bollywood News)
क्रॉफर्ड मार्केटमधील क्राईम ब्रँच लॉकअपमध्ये बुधवारी (१ मे) अनुज थापर मृतावस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने लॉकअपच्या वॉशरूममध्ये चादरीच्या पट्टीच्या सहाय्याने गळफास घेतली होती.
गुरुवारी (२ मे) सायंकाळी भायखळ्यातील जे.जे. रुग्णालयात आरोपी अनुज थापनचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या मानेवर जखमेच्या खुणा आणि गुदमरल्याच्या खुणा आढळून आल्या. त्यावरून अनुज थापरचा मृत्यू गळफास घेऊनच झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालामध्ये स्पष्ट झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. (Entertainment News)
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी, अनुज थापन, सोनू बिश्नोई, शूटर सागर पाल आणि विकी गुप्ता यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोईला वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.