Anita Date : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दातेने खरेदी केली नवी कोरी गाडी; अभिनेत्रीवर होतोय कौतुकाचा वर्षाव

Anita Date Bought New Car : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दातेने नवी कोरी अलिशान कार खरेदी केली आहे.
Anita Date Bought New Car
Anita Date Bought New CarInstagram

Anita Date Bought New Car

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दातेने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. तिने मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवरून चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्रीने नवी कोरी अलिशान कार खरेदी केलेली आहे.

Anita Date Bought New Car
Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

अभिनेत्रीने नवी कार खरेदी केल्याचा व्हिडीओ ह्युंडाईच्या संबंधित शोरूमच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर नवी कार खरेदी केल्याचा आनंद दिसत आहे. अभिनेत्रीने एक्सटर ह्युंडाई नावाची कार खरेदी केलेली आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री गाडीची पुजा करताना दिसत आहे आणि केक कापताना दिसत आहे. अभिनेत्रीसोबत मराठी टिव्ही अभिनेता उमेश जगतापही दिसत आहे. त्यांनीही अनिताच्या नव्या कारची पुजा केली.

सध्या अनिता दातेच्या नवी कार घेतल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने नवी कार खरेदी केल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेता अक्षर कोठारी, मयूरी वाघ, श्रृती मराठे, शर्मिला शिंदे, किशोरी अंबिये, राधिका आपटे सह अनेक मराठमोळ्या कलाकारांनी नव्या गाडीनिमित्ताने अनिताला शुभेच्छा दिल्या आहेत.

Anita Date Bought New Car
Spruha Joshi : स्पृहा जोशीचं बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण, 'या' वेबसीरीजमध्ये साकारली प्रमुख भूमिका

अनिता दातेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत अनिताने राधिका हे पात्र साकारले होते. या मालिकेमधून तिला महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धी मिळाली आहे. तिने ‘नवा गडी नवा राज्य’ या मालिकेमध्येही तिने प्रमुख भूमिका साकारली होती. तर ‘मी वसंतराव’ आणि ‘वाळवी’ या चित्रपटातही तिने प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या कलर्स मराठीवर टेलिकास्ट होणाऱ्या ‘इंद्रायणी’ ह्या मालिकेतही ती प्रमुख भूमिका साकारत आहे.

Anita Date Bought New Car
Gurucharan Singh Fees : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’साठी गुरुचरण सिंह किती मानधन घ्यायचा ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com