Ankita Lokhande Photo:
Ankita Lokhande Photo:instagram

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Ankita Lokhande Photo: पती रुग्णालयात दाखल असताना अंकिताने त्याच्यासोबतचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेत. शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये अंकिता आणि पती विकी जैन हॉस्पिटलच्या बेडवर एकमेकांच्या मिठीत पडलेले दिसत आहेत.

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे, याची प्रचिती चाहत्यांना आलीय. पती विकी रुग्णलयात दाखल असताना पत्नी अंकिताने तेथील फोटो शेअर केलेत. पतीच्या आजारपणाच्या वेळीदेखील त्याच्यासोबत आपण त्याच्यासोबत असल्याचं अंकिताने फोटो शेअर करत सांगितलंय.

बिग बॉस 17 फेम अंकिता लोखंडेचा पती विकी जैनला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पती रुग्णालयात दाखल असताना अंकिताने त्याच्यासोबतचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेत. शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये अंकिता आणि पती विकी जैन हॉस्पिटलच्या बेडवर एकमेकांच्या मिठीत पडलेले दिसत आहेत. पवित्र रिश्ता या सीरिअलमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री अंकिता लोखंडेने हा फोटो शेअर करताना त्याला एक हृदयस्पर्शी कॅप्शन दिले आहे. 'आजारात आणि निरोगी जीवनातही एकमेकांसोबत असं तिने कॅप्शन दिलंय.

विकी जैनची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अंकिताच्या जवळील व्यक्तीने दिलीय. दरम्यान गेल्या काही दिवसापूर्वी अंकिता लोखंडेच्या हाताला दुखापत झाली होती. त्यावेळी तिचा पती विकी जैन तिच्यासोबत होता. आता विकी ॲडमिट करावं लागल्यानंतर अंकिता त्याच्यासोबत आहे. हॉस्पिटलमध्ये दोघेही सोबत असल्याचे फोटो शेअर केलेत. अंकिता विकीच्या मिठीत विसावल्याच एका फोटोत दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये विकी हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसतोय. तर अंकिता तिच्या फोनवर व्यस्त असल्याचं दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यात विकी तिच्या हातावर पट्टी बांधताना दिसला होता. खाली पडल्याने अंकिताच्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला जेवणदेखील करता येत नव्हतं, तेव्हा तिचा पती विकीने तिची काळजी घेतली होती. त्याने त्याच्या हाताने तिला जेवण भरवलं होतं.

Ankita Lokhande Photo:
Beed News: प्रसिद्ध उद्योगपती सुरेश कुटे यांचा भाजपमध्ये प्रवेश, काही दिवसांपूर्वीच झाली होती IT ची छापेमारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com