Beed News: प्रसिद्ध उद्योगपती सुरेश कुटे यांचा भाजपमध्ये प्रवेश, काही दिवसांपूर्वीच झाली होती IT ची छापेमारी

Suresh D Kute News: प्रसिद्ध उद्योगपती सुरेश कुटे यांचा भाजपमध्ये प्रवेश, काही दिवसांपूर्वीच झाली होती IT ची छापेमारी
The Kute Group Founder Chairman & Managing Director Suresh D Kute Joins Bjp
The Kute Group Founder Chairman & Managing Director Suresh D Kute Joins BjpSaam TV

Businessman Suresh D Kute Joins BJP:

बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा 'द कुटे ग्रुप' चे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांनी सपत्नीक भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे सुरेश कुटे यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी अर्चना कुटे, मुलगा आर्यन कुटे यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच तिरुमला कंपनीवर आयकर विभागाने छापेमारी केली होती.

बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले आणि द कुटे ग्रुप 'च्या माध्यमातून देशभर ओळख असलेले सुरेश कुटे यांच्या कुटे उद्योग समूहावर काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने तपासणी मोहीम हाती घेत छापेमारी केली होती. त्यावेळेपासून सुरेश कुटे राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

The Kute Group Founder Chairman & Managing Director Suresh D Kute Joins Bjp
Karnataka News: कर्नाटकमध्ये मंदिरात उसळली गर्दी, शॉक लागल्याने चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती; 19-20 भाविक जखमी; VIDEO

सुरेश कुटे आणि अर्चना कुटे हे दाम्पत्य भाजपात प्रवेश करील, अशा अटकळी अनेक दिवसांपासून बांधल्या जात होत्या. यातच आज कुटे यांनी जाहीरपणे भाजपात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना प्रवेश दिला. (Latest Marathi News)

या प्रवेशाने आता बीड जिल्ह्यातील भाजपमधील अनेक समीकरणे बदलणार आहेत. भाजप कुटे यांच्याकडे लोकसभेचे उमेदवार म्हणून पाहत असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.

The Kute Group Founder Chairman & Managing Director Suresh D Kute Joins Bjp
Maratha Reservation Demand: मनोज जरांगे पाटलांच्या 'या' 10 अटी पूर्ण होतील?

विशेष म्हणजे या प्रवेशावेळी बीड जिल्ह्यातील भाजपचा कोणताही मोठा पदाधिकारी उपस्थित नव्हता, त्यामुळे आता कुटे यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस गट पंकजा मुंडेंच्या बीड जिल्ह्यात वेगळा सवतासुभा निर्माण करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com