Gurucharan Singh Fees : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’साठी गुरुचरण सिंह किती मानधन घ्यायचा ?

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम रोशन सिंह सोढी शो साठी किती मानधन घ्यायचा ?
Gurucharan Singh Fees
Gurucharan Singh FeesSaam Tv

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Gurucharan Singh Fees

सध्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम रोशन सिंह सोढी अर्थात अभिनेता गुरुचरण सिंह सध्या कमालीचा चर्चेत आहे. गेल्या १० दिवसांपासून अभिनेता बेपत्ता असून त्याच्या नातेवाईकांसह चाहते मंडळी चिंतेत आहे. अभिनेत्याचे शेवटचे लोकेशन दिल्लीच्या पालममध्ये आढळले होते. तेव्हापासून पोलिस अभिनेत्याचा शोध घेत आहेत.

अभिनेत्याचा बेपत्ता असल्याचे वृत्त ऐकून सर्वानाच धक्का बसला आहे. अभिनेत्याने गेल्या काही वर्षांपूर्वीच शोला सोडचिठ्ठी दिली होती. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम रोशन सिंह सोढी शो साठी किती मानधन घ्यायचा, जाणून घेऊया... (Televesion Actor)

Gurucharan Singh Fees
Bharti Singh Hospitalized : कॉमेडियन भारती सिंग रुग्णालयात दाखल; अभिनेत्री करतेय 'या' गंभीर आजाराचा सामना

गुरुचरण सिंहचे कुटुंबीय सध्या त्याचा शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्याची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याचे कळत आहे. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी गुरूचरणची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याचे सांगितले होते. सध्या पोलिस गुरुचरण सिंहचा शोध घेत असून बेपत्ता होण्यामागचे कारण शोधत आहे. गुरुचरण सिंह ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या एका एपिसोडसाठी हजारो रुपये मानधन आकरायचा. (Taarak Meheta Ka Ooltah Chashmah)

गेल्या १५ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत आहे. मालिकेला कायमच प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो, मालिकेचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. गुरुचरण एका एपिसोडसाठी ६५ हजार ते ८० हजारच्या आसपास मानधन आकरायचा. मात्र, कोरोना काळात वडील आजारी असल्यामुळे त्याने मालिका सोडली. वडील आजारी असल्यामुळे अभिनेत्याने करिअरमधून ब्रेक घेतला होता. (Entertainment News)

Gurucharan Singh Fees
Britney Spears : हॉटेलच्या बाहेर नको त्या अवस्थेत बाहेर पडली पॉप सिंगर; सोशल मीडिया ढवळून निघालं, ती म्हणतेय, हे सर्व खोटं आहे!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com