Britney Spears : हॉटेलच्या बाहेर नको त्या अवस्थेत बाहेर पडली पॉप सिंगर; सोशल मीडिया ढवळून निघालं, ती म्हणतेय, हे सर्व खोटं आहे!

Britney Spears News : हॉलिवूडची पॉपस्टार ब्रिटनी स्पिअर्स मध्यरात्री हॉटेलच्या बाहेर नको त्या अवस्थेत बाहेर पडली. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.
Hollywood Pop Star Exit Barefoot After Intense Fight With Boyfriend
Hollywood Pop Star Exit Barefoot After Intense Fight With BoyfriendSaam Tv

Hollywood Pop Star Exit Barefoot After Intense Fight With Boyfriend

हॉलिवूड पॉप सिंगर ब्रिटनी स्पियर्स कायमच ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. अशातच पॉप सिंगर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ब्रिटनी स्पियर्स बुधवारी (१ मे) रात्री लॉस अँजेलिसमधील एका हॉटेलमध्ये तिचं आणि तिच्या बॉयफ्रेंडचं कडाक्याचं भांडण झालं. भांडण झाल्यानंतर ब्रिटनी हॉटेलमधून विचित्र अवस्थेत बाहेर पडली. सध्या तिचे हे फोटोज् सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून पॉप सिंगर ब्रिटनी स्पियर्सने याबद्दल पोस्टच्या माध्यमातून आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे.

Hollywood Pop Star Exit Barefoot After Intense Fight With Boyfriend
Abhijeet Bichukale: अभिजीत बिचुकलेंचे ठरले, कल्याणमधून श्रीकांत शिंदेंविरोधात लढवणार निवडणूक

४२ वर्षीय ब्रिटनीला लॉस अँजेलिसमधील एका बड्या हॉटेलमधून सुरक्षितरित्या बाहेर काढताना फोटोग्राफर्सने पाहिलं. सध्या सोशल मीडियावर तिचे टॉपलेस फोटो व्हायरल झाले होत आहेत. सध्या ब्रिटनीचे टॉपलेस फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होत असून स्वत: ब्रिटनीने त्या घटनेबद्दल सांगितले आहे.

एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनी आणि तिचा बॉयफ्रेंड पॉल रिचर्ड दोघेही एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेले होते. त्यावेळी दोघांमध्येही काही कारणास्तव वाद झाला आणि त्या वादाचे रुपांतर मारामारीमध्ये झाले. त्यावेळी गायिका हॉटेलमधून अनवाणी, अर्धनग्न, ब्लँकेट गुंडाळलेल्या अवस्थेत आणि चेहऱ्यावर उशी धरून ती बाहेर पडली. ही घटना ३ मे ला मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती.

ब्रिटनीने ॲम्ब्युलन्स असतानाही हॉस्पिटलमध्ये जाण्यास नकार दिला होता. ब्रिटनीच्या आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या भांडणात तिच्या पायाला जखम झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. यावेळी ॲम्ब्युलन्सलाही बोलावण्यात आले होते. सध्या तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यावेळी ब्रिटनीच्या आजूबाजूला सिक्युरिटीही पाहायला मिळत आहे.

सध्या नेटकरी ब्रिटनीची मानसिक स्थिती बिघडल्याचे बोलत आहेत. ब्रिटनीने ही खोटी बातमी असल्याचे सांगितले. अभिनेत्रीने पोस्ट लिहित नेटकऱ्यांना घटनेबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. ती म्हणाली, ही खोटी बातमी आहे. मला काही दिवस शांततेची गरज आहे. मी स्वत:ला खंबीर करीत आहे. माझा पाय मुरगळला आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोणी बोलवलंही नव्हतं, तरीही सुद्धा ते हॉटेलवर आले होते. हे मला आवडलं नसल्याचंही ती आपल्या पोस्टमध्ये म्हणाली.

Hollywood Pop Star Exit Barefoot After Intense Fight With Boyfriend
Jolly LLB 3 Shooting Start : खरा जॉली कोण? अक्षय कुमार की अरशद वारसी; ‘जॉली एलएलबी ३’ च्या कथेत नवा ट्वीस्ट, शूटिंगला सुरुवात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com