अभिनेत्री राधिका आपटेने (Radhika Apte) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केलीय. ज्यामध्ये ती विमानतळावर अडकली असल्याचं दिसत आहे. तिच्या पाठीमागे बंद काचेचे दार आहे. तिच्यासोबत आणखीही बरेच लोकं दिसत आहे. (latest entertainment news)
राधिकाने तिच्या पोस्टमध्ये मुंबई विमानतळावरचे (mumbai Airport) काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये उपस्थित नागरिक विमानतळावरील व्यवस्थेमुळे त्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेले काही तास राधिका आपटे विमानतळावर अडकलेली आहे. या पोस्टद्वारे तिने नेमकं काय म्हटलं आहे, ते आपण सविस्तर जाणून घेऊया…('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राधिकाने पोस्ट केली शेअर
विमानतळावरील गर्दीचे व त्रस्त प्रवाशांसोबतचा व्हिडीओ शेअर करत राधिकाने (Radhika Apte) पोस्टमध्ये लिहिलंय की, अखेर मला ही पोस्ट करावी लागत आहे. आज सकाळी साडेआठ वाजता माझी फ्लाइट होती. आता बरोबर १०.५० झाले आहेत. तरीही अजून फ्लाइटचा काहीही पत्ता नाही. फ्लाइट लवकरच येईल, असं सांगून आम्हा सगळ्या प्रवाशांना एरोब्रिजमध्ये बसवलं आणि बाहेरून लॉक करण्यात आलंय. याठिकाणी बरेचजण त्यांच्या लहान मुलांबरोबर प्रवास करत आहेत. वृद्ध प्रवासी, लहान मुलं या सगळ्यांना गेल्या तासाभरापासून कोंडून ठेवलं आहे.
सुरक्षारक्षक दरवाजे उघडण्यास तयार (mumbai airport) नाहीत. येथील कर्मचाऱ्यांना कशाचीही पूर्ण माहिती नाहीये. त्यांचे क्रू मेंबर्स अजूनही आलेले नाहीत. शिफ्टमध्ये बदल झाल्यामुळे ते अजूनही नवीन क्रूची वाट पाहत आहेत. आता नवीन क्रू केव्हा येईल? याची कोणालाही कल्पना नाही. आम्हाला असं किती काळ बंद करून ठेवणार, याबाबत देखील काहीच माहिती नाही. बाहरेच्या एका कर्मचारी महिलेशी बोलण्यासाठी मी गेले. ती फक्त, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही एवढंच सांगत आहे. १२ वाजेपर्यंत ना पाणी.. ना वॉशरुम काहीच सुविधा नाहीये! या सुंदर प्रवासासाठी खूप धन्यवाद! अशी पोस्ट राधिकाने (Radhika Apte post) शेअर केली आहे.
राधिकाच्या पोस्टवर प्रतिक्रिया
राधिकाच्या या पोस्टवर (Radhika Apte on instagram) अनेकजणांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. सुयश टिळक, अमृता सुभाष, मेहक ओबेरॉय, कोंकणा सेन शर्मा, सारंग साठ्ये, तिलोत्तमा शोम या कलाकारांनी कमेंट सेक्शनमध्ये संताप व्यक्त केलाय. तसंच काही नेटकऱ्यांनी मुंबई विमानतळाच्या व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय, त्यांनी राधिकाला सोशल मिडियावर पाठिंबा दिलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.