Spruha Joshi : स्पृहा जोशीचं बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण, 'या' वेबसीरीजमध्ये साकारली प्रमुख भूमिका

Spruha Joshi Bollywood Debut : मराठमोळी अभिनेत्री आणि कवियित्री स्पृहा जोशीनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. स्पृहाने वेबसीरीजमधून बॉलिवूड पदार्पण केले आहे.
Spruha Joshi In Ranneeti Web Series
Spruha Joshi In Ranneeti Web SeriesInstagram

Spruha Joshi In Ranneeti Web Series

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी आहेत जे सध्या बॉलिवूडमध्येही आपलं नशीब आजमवू पाहत आहेत. सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, वैदेही परशुरामी, अमेय वाघ सह असे अनेक सेलिब्रिटी आहेत. जे मराठी सोबतच हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवत आहे. मराठमोळी अभिनेत्री आणि कवियित्री स्पृहा जोशीनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पण स्पृहाने बॉलिवूड पदार्पण चित्रपटातून नाही तर, वेबसीरीजमधून बॉलिवूड पदार्पण केले आहे. (Bollywood)

Spruha Joshi In Ranneeti Web Series
Gurucharan Singh Fees : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’साठी गुरुचरण सिंह किती मानधन घ्यायचा ?

स्पृहाने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिने चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. ‘रणनीती’ सीरिजमधून स्पृहा बॉलिवूड पदार्पण करते. स्पृहाने जिम्मी शेरगिलसोबत फोटो शेअर केलेला आहे. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते, "जिओ सिनेमावर रिलीज झालेल्या 'रणनीती' वेबसीरीजमध्ये साकारलेल्या छोट्याशा भूमिकेकरिता मला मिळालेले प्रेम आणि कौतुकाबद्दल मी सदैव ऋणी आहे." (Marathi Actress)

"जिमी शेरगिलसारख्या आवडत्या कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाल्यावर आणि काय हवं? जिमीसोबत दुसऱ्यांदा काम करताना खूप मजा आली. सेटवरचा प्रत्येक क्षण काहीतरी शिकवणारा आणि वेगळा अनुभव देणारा होता. एवढ्या चांगल्या टीमचा मला भाग होता आलं यासाठी मी आनंदी आहे. या सीरिजचा एकही एपिसोड चुकवू नका नक्की पाहा." अशी पोस्ट स्पृहाने लिहिलेली आहे. (Web Series)

Spruha Joshi In Ranneeti Web Series
Gurucharan Singh Fees : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’साठी गुरुचरण सिंह किती मानधन घ्यायचा ?

‘रणनीती’ सीरिजचे कथानक बालाकोट एअरस्ट्राइकवर आधारित आहे. वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत, लारा दत्त आणि जिमी शेरगिल आहे. ही वेबसीरीज २५ एप्रिलला ‘जियो सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली आहे. (Entertainment News)

Spruha Joshi In Ranneeti Web Series
Britney Spears : हॉटेलच्या बाहेर नको त्या अवस्थेत बाहेर पडली पॉप सिंगर; सोशल मीडिया ढवळून निघालं, ती म्हणतेय, हे सर्व खोटं आहे!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com