Loksabha Election: प्रसिद्ध गायक नंदेश उमप लोकसभेच्या रिंगणात; ईशान्य मुंबईमधून भरला अर्ज

Loksabha Election: शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र आणि प्रसिद्ध गायक नंदेश उमप हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. नंदेश उमाप यांनी ईशान्य मुंबईमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Loksabha Election: प्रसिद्ध गायक, शाहीर नंदेश उमप लोकसभेच्या रिंगणात; ईशान्य मुंबईमधून भरला अर्ज
Nandesh Umap is playing role in the Dnyaneshwar Mauli serial Saam TV
Published On

मयुर राणे, मुंबई|ता. ४ मे २०२४

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेत्यांसह सिने जगत, संगीत जगतातील अनेक दिग्गजही निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. प्रसिद्ध शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र आणि प्रसिद्ध गायक नंदेश उमप हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. नंदेश उमाप यांनी ईशान्य मुंबईमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रसिद्ध गायक शाहीर नंदेश उमप हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. नंदेश उमप यांनी बहुजन समाजवादी पक्षाच्या वतीने ईशान्य मुंबईमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात नंदेश उमप यांच्यासमोर महायुतीचे मिहिर कोटेजा आणि महाविकास आघाडीचे संजय पाटील यांचे आव्हान असेल.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर नंदेश उमप यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समाजकार्यासाठी आपण ही काहीतरी केलं पाहिजे. या रिंगणात उतरले पाहिजे. कलाकार म्हणून नेहमीच प्रबोधन करत असतो. आता वेगळी इनिंग आपण खेळली पाहिजे, याच हेतून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याची प्रतिक्रिया यांनी दिली.

Loksabha Election: प्रसिद्ध गायक, शाहीर नंदेश उमप लोकसभेच्या रिंगणात; ईशान्य मुंबईमधून भरला अर्ज
Loksabha Election: निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांकडून एका कुटुंबाला मारहाण? सुजय विखेंचा आरोप; नगरमध्ये राजकारण तापलं!

तसेच "आपल्या सामाजिक जिवनात अडचणी सर्वांना असतात. सगळ्या गोष्टी पुर्ण होत नाहीत. त्याचा पाठपुरावा आपल्याला करता येतो का? कलाकारांसाठी काही करता येईल का? कलाकारांचेही अनेक प्रश्न आहेत. त्यांच्यासाठी भांडणा येईल का? याआधीच्या सरकारमध्ये मी सांस्कृतिक खात्यात काम करत होतो, तेव्हाही मी हे करत होतो. त्यामुळे कलाकारांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं नंदेश उमप म्हणाले.

Loksabha Election: प्रसिद्ध गायक, शाहीर नंदेश उमप लोकसभेच्या रिंगणात; ईशान्य मुंबईमधून भरला अर्ज
महाराष्ट्रातील कारागृहांत चाललंय तरी काय? कळंब्यात पुन्हा 10, भंडा-यात 1 मोबाईलसह बॅटरी जप्‍त

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com