Salman Khan House Firing Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan Threat Case : सलमान खानला मारण्यासाठी थेट पाकिस्तानमधून मागवली हत्यारे? आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे

Salman Khan News : अभिनेता सलमान खान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात काही धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला मारण्याचा कट रचण्यात आला होता. सतर्कतेमुळे वेळीच आरोपींच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश आले आहे. १४ एप्रिलला पहाटे मुंबईच्या बांद्रातील गॅलेक्सी अपार्टमेंटवर दोन अज्ञातांनी गोळीबार केला होता. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली होती. आता या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी प्रकरणात ३५० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत, जाणून घेऊया चार्जशीटबद्दल...

नवी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमधील पाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी त्या पाचही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सिद्धू मूसेवालाप्रमाणेच सलमानचीही हत्या घडवून आणण्याचा कट त्या आरोपींचा होता. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोई टोळीने सलमान खानवर हल्ला करण्यासाठी २५ लाख रुपयांची सुपारी दिली होती. सलमान खानची हत्या करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगने पाकिस्तानातून AK-47 रायफल मागवल्या होत्या.

सलमान खान याला सिद्धु मुसेवाला याच्या प्रमाणेच मारण्याची तयारी होती. शुटिंगदरम्यान किंवा त्याच्या पनवेलमधील फार्महाऊसवर हत्या करण्याची तयारी करण्यात आलेली होती. याबद्दलची सविस्तर माहिती त्या चार्जशीटमध्ये पोलिसांनी दिलेली आहे. या हत्येचं प्लॅनिंग ऑगस्ट २०२३ ते एप्रिल २०२४ पर्यंत करण्यात आले होते.

सलमान खानच्या दररोजच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी तब्बल ६० ते ७० लोकं होती. ही सर्व लोकं ही अपडेट एका व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये शेअर करत होते. ही ६० ते ७० लोकं सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंट, पनवेलचं फार्महाऊस आणि फिल्म सिटीमधील त्याच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवायचे. नवी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात अनेक खुलासे करण्यात आले आहेत.

गु्प्तहेर खात्याची माहिती, आरोपींचे मोबाईल फोन, त्यातील संभाषण, तांत्रिक माहिती, व्हॉट्सॲप ग्रुप, टॉवर लोकेशन आणि ऑडिओ-व्हिडिओ कॉल्स आधारे दोषारोपपत्रात पुरावे गोळा केले आहेत. त्याआधारेच ३५० पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. धनंजय तापसिंह उर्फ अजय कश्यप (28), गौतम विनोद भाटिया (29), वासपी महमूद खान उर्फ चीना (36), रिझवान हसन उर्फ जावेद खान (25), आणि दीपक हवासिंह उर्फ जॉन वाल्मिकी (30) असे या आरोपींची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची मनोज जरांगेवर टीका, म्हणाले... VIDEO

5 स्टार रेटिंग असलेली कार १ लाखांनी स्वस्त, Nissan Magnite कारची नवीन किंमत किती?

Lonar News : जमिनीवर योग व आयुर्वेद हॉस्पिटल बांधण्याचा घाट; शेतीच्या बांधावरच शेतकऱ्याचे उपोषण

Movies Releasing This Week : 'आरपार' ते 'लव्ह इन व्हिएतनाम', 'या' आठवड्यात कोणते चित्रपट होणार प्रदर्शित?

Maharashtra Live News Update : अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं - विजय पांढरे

SCROLL FOR NEXT