प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रायव्हेट ऑडिओ क्लिप व्हायरल; सोशल मीडियावर पोस्ट करत दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

rashmika mandanna news : प्रायव्हेट ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका भडकली आहे. तिने थेट कारवाईचा इशारा दिला आहे.
rashmika mandanna
rashmika mandanna news Saam tv
Published On
Summary

रश्मिका मंदानाची जुनी प्रायव्हेट ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

ऑडिओ क्लिपमध्ये साखरपुड्यादरम्यानच्या छळाचा उल्लेख

अभिनेत्रीने क्लिप हटवण्याची केली मागणी

प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या प्रायव्हेट ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आली आहे. या क्लिपचं ८ वर्ष जुने कनेक्शन आहे. या ऑडिओ क्लिपवरून सिनेसृष्टीत चर्चांना उधाण आलं आहे. आता या ऑडिओ क्लिपवर प्रसिद्ध अभिनेत्रीने मौन सोडलं आहे.

प्रायव्हेट ऑडिओ क्लिपवरून अभिनेत्री मंदानाने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. अभिनेत्री मंदानाने म्हटलं की, 'दोघांच्या बोलण्यातील संवाद एडिट करून व्हायरल करण्यात आला आहे. तो ऑडिओ कोणत्याही संमतशिवाय सार्वजनिक केला आहे. आता हा ऑडिओ लवकरात लवकर काढून टाकावा'.

ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे?

व्हायरल ऑडिओ क्लिपममध्ये अभिनेत्रीची आई सुमन ही रक्षितने रश्मिकाचा साखरपुडादरम्यान केलेल्या छळाचा उल्लेख केला आहे. या ऑडिओ क्लिपमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चेनंतर अभिनेत्री रश्मिकाने सोशल मीडियावर पोस्ट करत भाष्य केलं आहे. अभिनेत्रीने पोस्ट करत थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

rashmika mandanna
प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नानंतर अवघ्या ४ वर्षांनी झाले वेगेळे

अभिनेत्री रश्मिकाने काय इशारा दिला?

अभिनेत्री रश्मिकाने म्हटलं आहे की, ऑडिओ क्लिप जाणून बुजून व्हायरल करण्यात येत आहे. वादाला तोंड फुटण्यासाठी व्हायरल केली जात आहे. व्हायरल होणारी ऑडिओ क्लिप ही माझ्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत आहे. लोक कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतात. या वादात ज्यांचा माझा दूर दूर पर्यंत संबंध नाही, त्यांच्याशी संबंध जोडला जात आहे.

rashmika mandanna
Kalyan News : भाजप आणि शिंदे गटात दुरावा? सत्तेत असूनही मनोमिलन नाही, नेमकं कोणत्या पदावरून बिनसलं?

'व्हायरल होणारा ऑडिओ क्लिप २४ हटवावी. अन्यथा २४ तासानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. ऑडिओ क्लिप व्हायरल करणारे व्यक्ती, इन्फ्लुएन्सर्स, डिजिटल प्लॅटफॉर्मवर कायदेशीर नोटीस पाठवली जाईल, असाही इशारा रश्मिकाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com